मेष - अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवसायातील दीर्घकाल रखडलेली येणी वसूल होतील. व्यवसायात समाधान कारक स्थिती राहील.
वृषभ - अपेक्षित महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील. कामे नियोजनानुसार व वेळेत पूर्ण होतील. परंतु कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ होण्याची शक्यता आहे.
मिथुन - महत्त्वाच्या कामांमध्ये इतरांचा सल्ला उपयोगी पडू शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींची मदत होऊ शकेल. भावंडांची मदत मिळेल.
कर्क - अचानक येणाऱ्या कामाच्या दबावामुळे घाबरू नका. आपल्या कर्तुत्वाने व बुद्धी कौशल्याच्या जोरावर संकटांवर मात कराल. यश मिळेल.
सिंह - नोकरीत समाधानकारक परिस्थिती राहील अधिकारांमध्ये वाढ होईल. वरिष्ठ तसेच सहकारी यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत राहील. अचानक आर्थिक लाभाची शक्यता.
कन्या - आज महत्त्वाची कामे पार पडू शकतात चालढकल करू नका. आळस महागात पडू शकतो. गुरुकृपेचा लाभ मिळवून मान्यवरांचे आशीर्वाद लाभतील.
तुळ - आत्मविश्वासाने आपण आपली कामे पूर्ण करावी इतरांची मदत जरी मिळत असली तरी ती आपण घेणार नाही. मित्रमंडळींमध्ये प्रिय व्हाल.
वृश्चिक - आपली दैनंदिन कामे मार्गी लागतील कुटुंबांमधील मुलामुलींच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागेल. शांतपणे निर्णय घेण्याची गरज.
धनु - काहींना प्रवासाचे योग येतील. मात्र प्रवासात वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण आवश्यक ठरेल. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करा अतिआत्मविश्वास नको.
मकर - कुटुंब परिवारात शुभ समाचार मिळतील. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील मुलामुलींची प्रगती होईल.
कुंभ - अचानक झालेले पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकित करेल त्याचबरोबर त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. खर्चाचे प्रमाणात वाढ होईल.
मीन - व्यवसाय धंद्यातील महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नव्या संकल्पनांचा वापर यशस्वी ठरून व्यवसायातील उलाढाल वाढेल मात्र स्पर्धकही बलवान होतील.