आजचे राशिभविष्य, ५ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 5, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष : रोजच्या कामात गोंधळ निर्माण करणाऱ्या घटना घडू शकतात महत्त्वाच्या कामात विचार करून निर्णय घ्या. नवीन उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा होईल.

वृषभ : नोकरीमध्ये वातावरण चांगले राहील मात्र आपल्या अधिकार कक्षेतच कार्य संपन्न करा. व्यवसाय धंद्यात नवीन उधारी देऊ नका. आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज.

मिथुन : कौटुंबिक सुख लाभून जोडीदाराशी चांगले संवाद होतील मात्र दिवास्वप्नात रमून राहू नका. मित्रमंडळींच्या सान्निध्यात दिवस आनंदात जाईल व्यसनांपासून दूर राहा.

कर्क : व्यवसाय धंद्यात आवश्यक ती फेर बदल करावे लागतील तसेच नोकरी मध्ये आपल्या कामामध्ये अद्यावत रहा. वरिष्ठांचे सहकार्य लावण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.

सिंह : समाजातील मान्यवरांच्या ओळखी वाढतील. सभा समारंभाचे निमंत्रण मिळू शकते. साहित्यिक व बुद्धिजीवी वर्गातील लोकांना मानसन्मान मिळवून अर्थार्जन होईल.

कन्या : आपल्या बोलण्याने इतरांची मने जिंकाल. अचानक आलेल्या आव्हानाला तसेच समस्यांना सामोरे जाल व त्यातून यशस्वीपणे मार्ग मिळेल. आत्मविश्वास टिकवून ठेवा.

तुळ : कामात लहान मोठे निर्णय घेताना विचार करून आणि शांततापूर्वक निर्णय घ्या समोरच्या व्यक्ती चा सल्ला उपयोगी पडू शकतो. मित्रमंडळींच्या सहवासात आजचा दिवस आनंदी राहील.

वृश्चिक : एखादे महत्त्वाचे काम झाल्यामुळे दिवस समाधानात जाईल. धनलाभाचे योग बनत आहेत. नातेवाईक मित्रमंडळी इत्यादींचा सहवास लाभेल. परंतु खर्चाचे प्रमाण वाढू शकते .

धनु : आज नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. काही मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतील. कामानिमित्त लहान मोठ्या प्रवासाचे योग.

मकर : आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रेमात यश मिळेल. अति आत्मविश्वास टाळा नको ते धाडस नको.वाहने चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ : कौटुंबिक सुख मिळेल कुटुंबातील सदस्यांचे वाढते सहकार्य मिळाल्यामुळे समाधानी रहाल. मनास आनंद देणाऱ्या वार्ता मिळतील. नवीन खरेदी होईल.

मीन : व्यवसाय-धंद्यात नोकरीत परिस्थिती सर्वसामान्य राहून दिवस ठीकठाक राहील. कुटुंबातील मुला-मुलींच्या कडून सुखद वार्ता मिळतील.

logo
marathi.freepressjournal.in