आजचे राशिभविष्य, ५ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 5, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - परदेशात आपले काही व्यवहार असतील तर ते आज व्यवहार होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या, कर्जप्रकरणे चांगली हाताळली जातील.

वृषभ - आपल्या मध्ये काम करण्याची स्फूर्ती जास्त असेल.आपले काम आपल्या पद्धतीनेच व्हायला हवी अशी आपली इच्छा आहे. सहकाऱ्यांच्या मतांना प्राधान्य द्यावे लागेल.

मिथुन - व्यापार व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणावी लागतील त्यासाठी आपणास जास्त वेळ द्यावाच लागणार आहे. जाणकार व्यक्तींची मदत घ्यावी लागणार आहे.

कर्क - व्यापार व्यवसायातील अडचणी दूर होतील. पण कामे सुरळीत होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील, आपण आपल्या बुद्धी चातुर्याचा उपयोग करावा लागणार आहे.

सिंह - विनाकारण जास्त विचार करू नका, उगाचच मनावर ताण येण्याची शक्यता आहे. आपण आपला आत्मविश्वास चांगला ठेवा. महत्वाच्या कामांकडे लक्ष ठेवा.

कन्या - आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.जोडीदाराकडे लक्ष ठेवा, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यापार व्यवसाय यात प्रगती होण्यासाठी भागीदाराची मदत होईल.

तुळ - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कामामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी झाल्यासारखे आपल्याला वाटणार आहे.

वृश्चिक - आपल्याला शुभ ग्रहांची साथ आहे. तरीसुद्धा कामांमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्या हुशारीने बुद्धिचातुर्याने काम करणे गरजेचे आहे. तुमचे स्वतःचे उपासना त्यासाठी कामाची येईल.

धनु - आपल्या कार्यक्षेत्रात नवीन आशादायक चित्र समोर येणार आहे. आतापर्यंत संथ चाललेल्या व्यवहारांना गती येईल. मात्र काम करताना खूप घाई गडबड करू नका.

मकर - कोणतेही काम काम करताना त्यामध्ये नीटनेटके पणा असावा, असे आपणास वाटते, त्याप्रमाणे आजचे काम होणार आहे. नोकरी-व्यवसायात उत्साहवर्धक परिणाम समोर येणार आहेत.

कुंभ - आपल्या कार्यक्षेत्रात कामाकडे लक्ष द्यावे लागणार आहे कोणत्याही कामाला विलंब लागणार नाही याची काळजी घ्या. नवीन कामांकडे सातत्याने प्रयत्न करून यश लाभणार आहे.

मीन - एकाच वेळेस अनेक प्रस्ताव समोर येणार आहे. कोणता प्रस्ताव घ्यावा यासंबंधी विचारात पडाल. आर्थिक दृष्ट्या चांगला प्रस्ताव असेल तोच आपण निवडाल.

logo
marathi.freepressjournal.in