आजचे राशिभविष्य, ५ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, September 5, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - ठरवलेल्या कामांना प्राधान्य द्या. चांगल्या विचारांची देवाण-घेवाण होणार आहे. लोकांच्या निर्णय निर्णयामुळे मनाचा गोंधळ उडू शकतो. स्वतः ठामपणे निर्णय घ्या. व्यवसायातील वाद मिटवा.

वृषभ -आपल्या कामाचा उरक वाढणार आहे.नोकरीतील कामांना यश आल्यामुळे उत्साह वाढणार आहे.मनोरंजनाकडे कल असणार आहे. मनासारखी खरेदी कराल. लाभ होणार आहेत.

मिथुन - कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.त्याप्रमाणे आपल्याला कामाचे नियोजन करावे लागणार आहे.घरातील व्यक्तींना आपले विचार पटवून द्यावे लागणार आहेत.

कर्क - एखादे आडून राहिलेले काम पूर्ण होणार आहे. आर्थिक आवक मनासारखी असणार आहे. नावलौकिकात भर पडेल. मात्र नोकरी करणाऱ्यांना अस्थिरता जाणवेल.

सिंह - महत्वाच्या कामात थोडे अडथळे येण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहाल. मनामध्ये कावळ्याला अनेक विचार येण्याची शक्यता आहे.आत्मविश्वासाने काम करा.

कन्या - तुमच्यामध्ये असल्यामुळे लोकांची चांगली कामे होतील. मन प्रसन्न राहणार आहे. जुने मित्र भेटतील.त्यामुळे दिवस आनंदात जाणार आहे.व्यापार व्यवसायिकांना अपेक्षित लाभ मिळतील.

तुळ - कलाकारांना व खेळाडूंना नवीन संधी प्राप्त होतील. आपणास चांगले मार्गदर्शक लाभणार आहेत. नवीन योजना कार्यान्वित होण्याची शक्यता. संततीची प्रगती होईल.

वृश्चिक - नियोजनपूर्वक केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीमध्ये चांगली परिस्थिती असेल. विविध प्रकारच्या कामांना गती मिळणार आहे.आपल्या मनाप्रमाणे सर्व कामे होणार आहेत.

धनु - वारसा हक्काच्या संपत्तीमध्ये प्रश्न उभे राहणार आहेत.आपला सल्ला योग्य असणार आहे.घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.अडथळ्यांची शर्यत सहजपणे पार पाडाल.

मकर - व्यापार व्यवसायातील कामे मार्गी लागणार आहे त्यामुळे मनातील ताण कमी होणार आहे.आपणाला जास्त काम करावे लागणार आहे.जोडीदाराची मदत मिळेल.

कुंभ - नोकरीमध्ये कुरबुरी मिटणार आहेत. नोकरीमध्ये प्रगती होईल. कामाचा ताण कमी होणार आहे. सहकारी व्यक्तीचे सहकार्य मिळून कामे पूर्ण कराल. आज जवळच्या व्यक्ती भेटतील.

मीन - व्यवसायात चांगली वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण जास्त राहणार आहे. जीवनसाथीशी थोडासा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in