मेष : स्वतःबद्दल आपणास आत्मविश्वास असणार आहे. अचानक प्रवास संभवतो. या प्रवासात आपणास चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे. बहिण भावंडा कडून आपणास आनंद मिळेल.
वृषभ : व्यवसायिक म्हणून काम करत असाल तर आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे. आपल्या कामातील अडथळे दूर होतील. निश्चित अशी प्रगती होणार आहे.
मिथुन : आजचा दिवस तसा मिश्रित स्वरूपाचा जाणार आहे.आज पैशापेक्षा कामात सुधारणा करण्याकडे आपण लक्ष द्यावे. नवीन काम येतील त्यातले योग्य पर्याय निवडायला लागणार आहे.
कर्क : मुख्य म्हणजे आपला आत्मविश्वास वाढवायला पाहिजे.आपल्यासमोर दोन प्रश्न आहेत एक तर स्वतःचे आरोग्य आणि कामातील अडथळे शांतपणे आणि सातत्याने काम करणे.
सिंह : मित्र आणि सहकार्यांशी सांभाळून वागा. निर्णय घेण्यामध्ये तरतमभाव जाणून मगच निर्णय घ्या. आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
कन्या : प्रकृतीस्वास्थ्यचा प्रश्न असल्या मुळे थकवा येणारे काम करू शकणार नाही. प्रत्येक प्रश्न सद्सद्विवेक बुद्धीने घ्या. राहत्या घरामध्ये काही त्रास असू शकतो. पण नोकरीमध्ये प्रगती आहे .
तुळ : आजचा दिवस आपणास खूप आनंदाचा जाणार आहे. छोट्या छोट्या कारणांनी चिडचिड करू नका .आजच्या दिवसाचे नियोजन केल्यास सर्व कामे नीटनेटकी होणार आहेत.
वृश्चिक : आज आपण सर्व बाबतीत सकारात्मक विचार केले पाहिजेत .कामात जरी अडथळे आले तरी प्रयत्नाने ते सुटणार आहेत. आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. सहकारी वर्गाशी वाद टाळेव.
धनु : स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा. आपले प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासामध्ये महत्त्वाचे निर्णय योग्य ठरणार आहे. आपला जोडीदार आपणास सर्व प्रकारे सहाय्य देणार आहे.
मकर : नोकरीमध्ये जास्त कष्ट पडणार आहे. जास्त काम करावे लागणार आहे. त्यामुळे मनोबल कमकुवत होण्याची शक्यता आहे. पूर्ण आत्मविश्वासाने काम करणे आवश्यक आहे.मनोबल वाढवा.
कुंभ : आजचा दिवस चांगला जाणार आहे. आपल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार आहे. आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पडल्यामुळे आपण खुश असणार आहात.
मीन : मालमत्तेच्या व्यवहारात मधून आपणाला चांगला फायदा मिळू शकतो. आर्थिक प्रश्न सहजतेने सुटणार आहेत. कामामध्ये चांगली प्रगती होणार आहे. व्यवसाय वृद्धि करण्याकडे लक्ष असणार आहे.