मेष - आपल्या स्वताबद्दल आपणास आत्मविश्वास असणार आहे.. अचानक प्रवास संभवतो. या प्रवासात चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे. बहिण भावंडा कडून आपणास आनंद मिळेल.
वृषभ - व्यवसायिक म्हणून काम करत असाल तर आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे. आपल्या कामातील अडथळे दूर होतील. निश्चित अशी प्रगती होणार आहे.
मिथुन - आजचा दिवस तसा मिश्रित स्वरूपाचा जाणार आहे. आज पैशापेक्षा कामात सुधारणा करण्याकडे आपण लक्ष द्यावे. नवीन काम येतील त्यातले योग्य पर्याय निवडायला लागणार आहे.
कर्क - आजचा दिवस काहीच आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागणार आहेत. मुख्य म्हणजे आपला आत्मविश्वास वाढवायला पाहिजे.
सिंह - मित्राआणि सहकार्यांशी सांभाळून वागा. निर्णय घेण्यामध्ये तरतमभाव जाणून मगच निर्णय घ्या. आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
कन्या - प्रकृतीस्वास्थ्य चा प्रश्न असू शकतो. त्यामुळे थकवा येणारे काम करू शकणार नाही. प्रत्येक प्रश्न सद्सद्विवेक बुद्धीने घ्या. राहत्या घरामध्ये काही त्रास असू शकतो. पण नोकरीमध्ये प्रगती आहे.
तुळ - आजचा दिवस आपणास खूप आनंदाचा जाणार आहे. छोट्या छोट्या कारणांनी चिडचिड करू नका. आजच्या दिवसाचे नियोजन केल्यास सर्व कामे नीटनेटकी होणार आहेत.
वृश्चिक - आज आपण सर्व बाबतीत सकारात्मक विचार केले पाहिजेत. कामात जरी अडथळे आले तरी प्रयत्नाने ते सुटणार आहेत. आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. सहकारी वर्गाशी वाद-विवाद टाळणे.
धनु - स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा. आपले प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासामध्ये महत्त्वाचे निर्णय योग्य ठरणार आहे. आपला जोडीदार आपणास सर्व प्रकारे सहाय्य देणार आहे.
मकर - नोकरीमध्ये जास्त कष्ट पडणार आहे. जास्त काम करावे लागणार आहे. त्यामुळे मनोबल कमकुवत होण्याची शक्यता आहे. पूर्ण आत्मविश्वासाने काम करणे आवश्यक आहे. मनोबल वाढवा.
कुंभ - आजचा दिवस चांगला जाणार आहे. आपल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार आहे. आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पडल्यामुळे आपण खुश असणार आहात.
मीन - मालमत्तेच्या व्यवहारात मधून आपणाला चांगला फायदा मिळू शकतो. आर्थिक प्रश्न सहजतेने सुटणार आहेत. कामामध्ये चांगली प्रगती होणार आहे. व्यवसाय वृद्धि करण्याकडे लक्ष असणार आहे.