मेष - आपल्या कौशल्यात व पराक्रमात वाढ होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. व्यापार व्यवसायांमध्ये नवीन डिल होऊ शकते. घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये आपण व्यस्त राहणार आहे.
वृषभ -आपल्या कार्यक्षेत्रात उत्साही असाल. आपले निर्णय विवेकपूर्ण असतील. आपल्या बुद्धी आणि विवेकाने आलेल्या अडचणी आपण चुटकीसरशी सोडवाल.
मिथुन - आज आपण आपल्या कार्यक्षेत्रात हुशारीने काम करणार आहे. आपले निर्णय पण बरोबर येणार आहेत. त्यामुळे व्यापार-व्यवसायात किंवा नोकरी मध्ये आपली स्तुती होईल.
कर्क - आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने आपली मानसिक स्थिती बिघडणार आहे.घरात किंवा घराबाहेर वाद विवादाचे प्रसंग समोर येतील, पण त्याला आपण शांतपणे सामोरे जाणार आहात.
सिंह -आपल्यामध्ये उत्साह भरपूर आहे ज्या व्यक्ती पोलीस किंवा सैन्यदलात आहेत त्यांच्याकडून साज पूर्ण कार्य होईल. व्यापार-व्यावसायिकांना अपेक्षित लाभ होतील.
कन्या - मोठ्या उद्योगपतींना आणि व्यवसायिकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. एखाद्या विदेशी कंपनीकडून आपल्या कंपनीचे चांगले कॉन्ट्रॅक्ट होणार आहे.
तुळ - प्रेमी-प्रेमिका साठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुठेतरी लांब फिरायला जाण्याचा विचार असणार आहे.विद्यार्थ्यांना परदेशातून शिक्षणाच्या संधी येतील.
वृश्चिक - आपण जेवढे काम कराल तेवढा आपणास परतावा मिळणार नाही. यामुळे मन खट्टू होणार आहे. पण उगाचच नाराज होऊ नका. आर्थिक फायदे बर्यापैकी असतील.
धनु - आजचा दिवस आपणास यश मिळवून देणार आहे.व्यापार व्यवसायामध्ये भागीदाराच्या कौशल्यामुळे आपणास आर्थिक फायदे होतील. परिवाराच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल आहे.
मकर - आपल्या नोकरी मध्ये आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली जाऊ शकते, ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्याला सातत्याने काम करावे लागेल.
कुंभ - स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना जास्त मेहनत करावी लागणार आहे. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण आपली तयारी करा व सफलता प्राप्त करून घ्या. तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.
मीन - व्यापार व्यवसायामध्ये आपण रचनात्मक गोष्टींचा पूर्णपणे वापर करणारा आहात. आपल्या कामामध्ये पूर्णपणे सकारात्मक दृष्टिकोन असणार आहे. कुटुंबाची कामे व्यवस्थित होतील.