मेष - आज आपण खूप धाडसी असाल आक्रमकही असाल. आज कार्यरत असाल कामांमध्ये प्रगती होईल. आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल असल्यामुळे संधीचा फायदा घ्या.
वृषभ - आज आपणाला अडचणीतून आणि तणावातून मुक्तता मिळणार आहे सहकाऱ्यांकडून आणि कुटुंबातील व्यक्तींकडून पूर्णपणे सहकार्य मिळणार आहे.
मिथुन - आज आपल्या मध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे. आपला दृष्टिकोण हि सकारात्मक असेल. आपल्या भावाच्या प्रकृतीविषयी कुरबुरी असू शकतील. कोणते मोठे बदल टाळा.
कर्क - आज आपला दिवस चांगला जाणार आहे. आपल्या कार्यावर प्रकाश पडणार आहे. घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात. आर्थिक प्राप्ती चांगल्यापैकी होणार आहे.
सिंह - सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. आपल्यामध्ये आत्मविश्वास पुरेपूर असणार आहे. मनावरील मरगळ दूर झाल्यामुळे उत्साही राहणार आहात.
कन्या- आज आपल्या समोर येणाऱ्या प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे. आजचा दिवस फारच आशादायक नसणार. खर्चाचे हे प्रमाण वाढणार आहे.
तुळ - नोकरीच्या संदर्भातील कामे आशादायक असणार आहेत. आपल्या जर आपल्या कार्य क्षेत्रामध्ये नवीन बदल करायचा असल्यास करू शकता.
वृश्चिक - आज आपल्याला भरपूर काम करावे लागणार आहे. पण त्याचा मोबदला अतिशय चांगला मिळेल. फक्त काम करण्याची तयारी ठेवा. कुटुंबियांचे सहकार्य लाभणार आहे.
धनु - आज आपण खूप शांत आणि स्थिर असणार आहात. त्यामुळे आपण घेतलेले निर्णय बरोबर असणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करणार आहात.
मकर - आज आपण फार दक्ष असणे आवश्यक आहे. काही अनपेक्षित समस्या उद्भवू शकतात. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे चांगले राहील. आरोग्याचे काळजी घेणे आवश्यक आहे.
कुंभ - घरातील वातावरण चांगले असेल. नातेसंबंध चांगले राहणार आहेत. मानसिक स्थैर्य चांगले असणार आहे. भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे.
मीन - आपला आज नोकरी-व्यवसाय मध्ये अत्यंत अनुकूल काळ आहे. हाती घेतलेल्या कामांमध्ये पूर्ण यश मिळून ते पूर्ण होणार आहे. मात्र स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.