मेष - आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय सरळ आणि शांतपणे जाणार आहे. कामाची दिशा आपली ठरलेली असेल, त्यामुळे कामात काही फारसे अडथळे येणार नाहीत.
वृषभ - आज आपणाला काही शुभ संदेश मिळणार आहेत. महत्वाच्या कामासाठी प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे. उद्दिष्ट साध्य झाल्याने मानसिक समाधान खूप चांगले असणार आहे.
मिथुन - मानसिक मनोबल उत्तम असणार आहे.कामाचा उत्साह वाढल्याने कामामध्ये चांगली प्रगती होणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी उसनवारी वसूल होण्याचा दिवस आहे.
कर्क - आज आपण अतिशय सकारात्मक दृष्टीने प्रश्न सोडवणार आहात. विद्यार्थ्यांना यश येणार आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन संधी येणार आहेत.आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहणार आहे.
सिंह - आजचा दिवस फारसा समाधानकारक असणार नाही. कामामध्ये अचानक बदल होण्याची शक्यता आहे. कुठल्याही प्रकारे व्यापार-व्यवसायात नोकरीमध्ये धोका पत्करू नका.
कन्या - आज कामामध्ये उत्साह राहणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये सकारात्मक बदल घडणार आहे. तुमची तत्वे व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर राबवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात.
तुळ - तुमच्या मनात सध्या अनेक कल्पक आणि नवनवीन कल्पना येत असतील, पण त्याचा चांगल्या आणि वाईट बाजूने दोन्ही बाजूने विचार करणे आवश्यक आहे.
वृश्चिक - तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या प्रकृतीचे प्रश्न समोर येण्याची शक्यता आहे. तसेच घरातील प्रश्नांकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. वाहन सांभाळून चाल लावणे.
धनु - तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी होणार आहात. तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे. शत्रु तोंड वर काढण्याची शक्यता आहे. पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही.
मकर - आपणाला आपल्या जोडीदाराकडून काही आनंदाचे क्षण मिळणार आहेत. व्यावसायिकांना अडथळे आले तरी सातत्याने कामात लक्ष देणे आवश्यक आहे.
कुंभ - आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. आरामदायी वस्तूंवर आणि चुकीच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. लहान सहान कारणांवरून वाद-विवाद करू नये.
मीन - आपण आपले काम पूर्ण क्षमतेने करणार आहात. आज कुठल्या तरी कारणाने आनंदित राहणार आहात. आपली कामे सफल होणार आहेत. प्रवास फलद्रूप होतील.