मेष - नोकरीतील वातावरण चांगले राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कामाचा ताण जाणू शकतो.
वृषभ - व्यवसाय धंद्यात समाधान कारक घटना घडतील अर्थ मान उंचावेल. आरोग्यात सुधारणा कौटुंबिक सुख मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहता येईल.
मिथुन - नशिबाची साथ मिळाल्यामुळे महत्त्वाची कामे पार पाडू शकाल मात्र आपल्या कामात कार्यमग्न राहणे महत्त्वाचे ठरेल प्रयत्न यशस्वी होतील सरकारी कामात यश.
कर्क - कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रवास घडू शकतो प्रवासात नवीन ओळखी होतील नोकरी-व्यवसायात चांगली परिस्थिती राहील शुभवार्ता मिळतील.
सिंह - आरोग्य सुधारेल. इतरांच्या टीकेला आपल्या कृतीतूनच उत्तर मिळेल. हित शत्रूवर विजय मिळवाल. इतरांच्या टीकेला फारसे महत्त्व देऊ नका. मानसन्मान मिळेल.
कन्या - महत्त्वाच्या कामांमध्ये आपल्या जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल व्यवसाय धंद्यात आवक वाढून दाखवाचे प्रमाण वाढेल आर्थिक स्थिती चांगली राहील.
तुळ - विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेळेच्या सुयोग्य वापर करणे आपल्या हातात आहे.
वृश्चिक - काहींना पर्यटनाच्या माध्यमातून प्रवास योग मात्र प्रवासात खाण्यापिण्याची पथ्ये पाळा तसेच वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राहील व्यसने टाळा.
धनु - विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करायला मिळाल्यामुळे समाधान मिळेल. शैक्षणिक प्रगती होईल. स्पर्धात्मक यश मिळवू शकाल.
मकर - आपल्याला भाग्याची साथ मिळाल्यामुळे नोकरीत महत्त्वपूर्ण घटना घडू शकतात आर्थिक आवक चांगली राहील. सामाजिक कौटुंबिक कार्यात स्वतःच्या रागावर नियंत्रण आवश्यक.
कुंभ - व्यवसाय-धंदा तसेच नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील भावंडांशी गैरसमज होण्याची शक्यता. तसेच वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल.
मीन - गृहसौख्य उत्तम राहील सहकुटुंब सहपरिवार जवळचे प्रवास कराल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील. महत्त्वाचा बातम्या समजतील.