आजचे राशिभविष्य, ८ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत
मेष - नोकरीमध्ये लाभ होतील. अनेकांचे प्रगती होणार आहे. आपला नावलौकिक होईल. भावंडांशी वाद विवाद करू नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्षात ठेवा. कामामध्ये सातत्य ठेवावे.
वृषभ - आपली आर्थिक आवक चांगली असली तरी खर्च वाढणार आहेत. खर्चावर नियंत्रण असू द्या. अचानक लाभ होतील. अनेक कामे मार्गी लागतील. व्यवसायामध्ये सामान्य परिस्थिती असेल.
मिथुन - नोकरी-व्यवसाय त्यात ताण कमीहोणार आहे, मुळे कामे करायला सोपी होणार आहेत. व्यवसायातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा.
कर्क - आजचा तुमचा धावपळ व घाईगर्दी चा दिवस असणार आहे. शिवाय नोकरी मध्ये ताणतणावाची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत शांत चित्त्याने कार्यरत रहा.
सिंह - नोकरी आणि व्यवसाय दोन्ही ठिकाणी आपणास परिस्थिती अनुकूल राहणार आहे. खर्च मात्र वाढणार आहेत. पण आवकही त्याच प्रमाणे बऱ्यापैकी असेल. अचानक लाभ होतील.
कन्या - व्यापार व्यवसायामध्ये कोणतेही मोठे धाडस करू नका. ते एखाद्या वेळेस अंग लकट येण्याची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. कायद्याची बंधने पाळावेत.
तुळ - पूजा पाठांमध्ये मन रमेल, काही व्यक्तींना कामानिमित्त प्रवास घडेल. तब्येतीला जपणे आवश्यक आहे. काहीजण समाजसेवा मध्ये राहतील. काहींना प्रसिद्धीचे योग आहे.
वृश्चिक - काहींना गुप्त शत्रूचा त्रास संभवतो, आपण त्यांना पुरून उराल. व्यवसायामध्ये यश प्राप्त होईल. गृह सौख्यात वाढ आहे. संतती कडे लक्ष द्यावे लागले. आरोग्याला मात्र जपा.
धनु - नोकरी-व्यवसायात सामान्य स्थिती राहील. मुलांच्या प्रगती च्या बातम्या कानावर येतील. काही जण समाज सेवेमध्ये मग्न असतील. मात्र घर आणि घरातील त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.
मकर - नोकरीमध्ये बदल होईल कामाचा ताण वाढणार आहे. प्रवास शक्यतो टाळा. तब्येतीला जपणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
कुंभ - आपली मानसिकता उत्तम राहणार आहे. त्यामुळे उत्साही व आनंदी वातावरण असणार आहे. नोकरी मध्ये जास्त काम करावे लागले तरी भविष्यात त्याचा फायदा होणार आहे.
मीन - काम सुरळीत होणार आहेत. त्यामुळे धावपळ दगदग होणार नाही. मानसिक संतुलन चांगले राहणार आहे. आर्थिक आवक चांगली राहणार आहे. घरातील आवश्यकच खर्च होतील.
