मेष - हाती घेतलेले काम सातत्याने केल्याने त्यामध्ये सुयश लाभणार आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्यास लवकर लागतील. कामामध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
वृषभ - अपेक्षित काम वेळेवर होणार नाही कामांमध्ये भरपूर वेळ जाणार आहे, कामाचे प्लॅनिंग करा. व्यवस्थित नियोजन केल्यास आर्थिक नुकसान होणार नाही. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे.
मिथुन - नवीन संधी मिळतील, अपेक्षित संधीची वाट बघत होता ती येईल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहणार आहे. महत्त्वाच्या | कामात चातुर्य दाखवा, त्यामुळे यश येणार आहे.
कर्क - कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. महत्त्वांच्या गरजांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. महत्वाच्या कामांमध्ये कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
सिंह - व्यापार-व्यवसायात संभावित बदल होणार आहेत. आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण कराल. सातत्याने काम केल्याने नवीन नवीन कामे मिळतील. लेखक आणि कवींना चांगला दिवस प्रशंसा होईल.
कन्या - आत्मविश्वासाने काम करावेलागणार आहे. महत्त्वाची कामे आज करून घ्या. सरकारी कामे काही राहिलेली असल्यास | तीही आज करून घ्या.
तुळ - जनसंपर्क वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मोठ्या लोकांची संबंध येतील. सुसंवाद होतील. मोठ्या प्रमाणावर काम करण्याचा संकल्प असेल, त्यासाठी व्यवस्थित नियोजन करा.
वृश्चिक - मन अनुत्साही असेल. काम करावे असे वाटणार नाही. हाताखालील लोकांचे सहाय्य घ्यावे लागणार आहे. जास्त काम हे करावे लागणार आहे, त्याची तयारी ठेवा.
धनु - अपेक्षित सुसंधी लाभतील आपली मते दुसऱ्याला व्यवस्थित पाठवून द्याल. नोकरी व्यवसायांमध्ये जास्त उलाढाली होतील अपेक्षित परिणाम आपणास मिळणार आहे.
मकर - हितशत्रू डोके वर काढणार आहे. उगाचच वादविवादाला तोंड फोडू नका, तुमचे मत बरोबर आहे ते ते कालांतराने समोर येणारच आहे. मनोबल वाढवण्याची जरुरी आहे.
कुंभ - आजची महत्त्वाची कामे तुम्ही जिद्द आणि चिकाटीने पूर्ण कराल. नवीन नवीन परिचय होतील. धार्मिक आणि सामाजिक कामांमध्ये आवड निर्माण झाल्याने भरपूर काम कराल.
मीन - नोकरी व्यवसायात प्रगती कराल. नवीन आव्हाने समोर आली तरी योग्य काम हातून होईल. अपेक्षित गाठीभेटी होऊन नवीन कामे हाती घ्याल जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करा.