आजचे राशिभविष्य, ९ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 9, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on: 

मेष - आरोग्य उत्तम राहील. आजूबाजूला उत्साह उमेद वाढवणाऱ्या घटना घटित होतील. पारिवारिक सौख्य लाभेल. शुभ दिवस.

वृषभ - नोकरीत चांगली परिस्थिती राहील तुमच्या कर्तबगारीला वाव मिळेल. एखादे महत्त्वाचे काम हातावेगळे करू शकाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन - आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मित्रमंडळींच्या वर्तुळातून चांगले सहकार्य मिळेल. मनासारख्या घटना घडतील.

कर्क - कुटुंबातील सर्वांचे सहकार्य लाभेल विशेषतः जीवन साथी बरोबर असलेले संबंध जास्त प्रेमळ कोणते मुलांकडून शुभवार्ता मिळतील.

सिंह - मानसन्मानाचे योग येतील मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील. काही महत्त्वाच्या बाबतीत आपल्याला महत्त्वाचे निर्णय धाडसाने घ्यावे लागतील आरोग्य चांगले राहील.

कन्या - महत्त्वाच्या कामात अडथळे येऊन कामे लांबणीवर पडू शकतात त्यामुळे नाराज होण्याची गरज नाही अविरत प्रयत्न करीत राहा. यश मिळेल.

तुळ - मन आशावादी उत्साही व आनंदी राहील. नियोजनाप्रमाणे कार्य पूर्ण होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी घडून अपेक्षित पत्रव्यवहार पूर्ण होतील.

वृश्चिक - शक्यतो महत्त्वाची कामे पुढे ढकलणे हिताचे ठरेल.वाद-विवाद टाळा. इतरांच्या मतांना प्राधान्य द्या. आपली प्रतिक्रिया लगेचच देणे टाळा.

धनु - कलाकार साहित्य क्षेत्रातील मंडळी व बौद्धिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना चांगला दिवस अनपेक्षित यश मिळू शकते.

मकर - शासकीय योजनांचा फायदा मिळू शकतो तसेच शासकीय कामात यश मिळेल. विनाविलंब कामे झाल्याने आश्चर्यचकित व्हाल.

कुंभ - आरोग्य चांगले राहून कुटुंबा मधून सुखदायक वार्ता मिळतील मुलांची प्रगती होईल त्यामुळे मनोबल व आत्मविश्वास वाढेल.

मीन - व्यवसाय धंद्यातील दीर्घकाळ प्रलंबित असणारी येडी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल व्यवसायातील तुमचे निर्णय अचूक ठरतील.