मेष - नोकरीमध्ये त्रास संभवतो. मानसिक तणाव जाणवणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पण तणाव असणार आहे. धाडसाने निर्णय घेऊन अडचणीतून मार्ग काढा. आर्थिक नियोजन चांगले ठेवा.
वृषभ - संतती विषयी काही महत्त्वाचे प्रश्न मार्गस्थ करणार आहात. त्यामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळणार आहे. आपल्या हातून काही चांगली कामे होणार आहेत. आवडतीचा क्षेत्रात काम कराल.
मिथुन - घरांमधील ज्येष्ठांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्यांची महत्त्वाची कामे आपणास पूर्ण करावी लागणार आहेत. घरातल्या व्यक्तींबरोबर सुसंवाद साधणार आहात. घरच्या कामाला प्राधान्य देणार आहात.
कर्क - आर्थिक आवक चांगली राहणार आहे. खर्च पण त्याच प्रमाणात वाढत राहणार आहे. भावंडांसाठी काही आपणास मदत करावी लागणार आहे. त्या गोष्टीची मनाची तयारी ठेवावी. प्रवासाची शक्यता आहे.
सिंह - व्यवसायात व्यक्तिशः लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. कामाच्या स्वरूपामध्ये चांगला बदल होणार आहे. विविध मार्गाने धनप्राप्ती होण्याचे योग आहेत. घरातील गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
कन्या - आजचा दिवस सर्वसाधारण असणार आहे. आपणास आज नवीन संधी येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाने निर्णय घेणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या बोलण्याचा प्रभाव असणार आहे.
तुळ - घरात किंवा घराच्या बाहेर वाद-विवाद होण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये संयम ठेवणे फार आवश्यक आहे. नवीन व्यवसायामध्ये गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे. जास्तीचा खर्च होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - आपली अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत. योग्य लोकांचे संगत लाभणार आहे. व्यापार व्यवसायातून आर्थिक लाभ चांगले होणार आहेत. तसेच पेंडिंग कामे पूर्ण करून घ्यावी. दिवस मनोज मजेत घालवाल.
धनु - काही कामांसाठी धावपळ होण्याची शक्यता आहे. आज महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन कामे करून घ्यावीत कारण कामे व्यवस्थित व सुरळीत होणार आहेत. सरकारी कामे काही राहिली असल्यास ती पण करून घ्या.
मकर - आज आपल्या हातून पूजा पाठावर खर्च होण्याची शक्यता आहे. आपली नोकरी-व्यवसायात प्रगती होणार आहे. आपले अंदाज बरोबर ठरू शकतात. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. प्रवास होण्याची शक्यता.
कुंभ - जीवन साथी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे वाद विकोपाला जाऊ देऊ नका. आर्थिक व्यवहार करताना दक्ष असणे गरजेचे आहे. प्रवास शक्यतो टाळणे चांगले. आपला खिसा पाकिट सांभाळणे आवश्यक आहे.
मीन - भागीदारीमध्ये ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना आज चांगला दिवस आहे व्यापारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जोडीदाराच्या असल्याने आर्थिक फायदे वाढणाऱ्या आहेत. जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे.