मेष - दिवस प्रसन्न राहील बँकांची कामे होतील सामाजिक मानसन्मान मिळू शकतो नव्या ओळखीतून लाभ होईल. धन्य लाभाची शक्यता.
वृषभ - तरुण-तरुणींच्या समस्या समतेल प्रेमात यश लाभेल व्यवसायिक वसूल होतील घरातील मुलांचे प्रश्न मिटतील. नोकरीची चिंता मिटेल.
मिथुन - आत्मविश्वास वाढेल. काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील व्यवसायात बदल करू शकाल. व्यावसायिक नियोजन यशस्वी होईल कामगारांचे सहकार्य लाभेल.
कर्क - सरकारी नोकरीत विशेष अधिकार प्राप्त होतील कार्यकक्षा रुंदा वेल. मात्र आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादा ओळखून आपले कार्य पूर्ण करावे. लहान-मोठा प्रलोभनाला बळी पडू नका.
सिंह - महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. अतिशय गतिमान घटना घडू शकतात आर्थिक प्राप्ती चांगली राहील अनेक कामे मार्गी लागतील मनाप्रमाणे कामे घडून येतील.
कन्या - हसत खेळत व मित्रमंडळींच्या सहवासात दिवस जाईल. ताण तणाव मुक्त वातावरणाचा लाभ मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल.
तुळ - आपल्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी चांगले यश मिळू शकतील स्पर्धात्मक यश मिळेल शैक्षणिक चिंता जाईल मात्र कुसंगती पासून दूर राहिलेले उत्तम वेळेचे नियोजन करा.
वृश्चिक -आर्थिक मदत मिळू शकते कुटुंबातील एखादी महत्त्वाची समस्या सुटेल वाद-विवाद शमतील. एकमेकांना समजावून घेण्याची भावना निर्माण होईल.
धनु - अतिआत्मविश्वास टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा प्रवासाचे योग आहेत वाहतुकीचे नियम पाळणे हितकारक ठरेल. आर्थिक आवक सामान्य राहील.
मकर - नकारात्मक विचार तीव्र होतील. उपासना करा. मार्ग मिळेल.अचानक कौटुंबिक समस्येला तोंड द्यावे लागेल. बँकांची कामे होतील. नोकरीतून दिलासा मिळेल.
कुंभ - तरुण-तरुणींना ओळखीतून विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात. विवाह बाबतीतील बोलाचाली वेगवान होतील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. व्यवसायिक येतील.
मीन - वडिलोपार्जित संपत्ती विषयीचे वाद मिटतील. भावंडांची संबंध सुधारतील एखाद्या कामात अडचणी जरी आल्या तरी मार्ग मिळेल. खर्च वाढू शकतो.