११ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
११ मे'चे राशीभविष्य!

मेष - सभा समारंभाची निमंत्रणे मिळतील. समाजामध्ये पत प्रतिष्ठा वाढेल. नोकरीमध्ये अनुकूल चांगली बातमी कळेल. मित्रमंडळींमध्ये आनंदात वेळ जाऊन एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन कराल.

वृषभ - प्रेमात यश संपादन करता येईल. एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळेल महत्त्वाच्या गाठीभेटी होती.. आर्थिक आवक चांगली राहील. आत्मविश्वास वाढेल खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मिथुन - विद्यार्थ्यांना चांगला दिवस विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळेल गुरुजनांचे आशीर्वाद तसेच मार्गदर्शन लाभेल. कोणताही निर्णय रागाच्या भरात घेऊ नका. कौटुंबिक सुख लाभेल.

कर्क - काही कारणास्तव प्रवास करावा लागेल मनोबल वाढविणारे एखादी घटना घडू शकते उत्साह वाढेल एखाद्या सरकारी प्रकरणातून त्रास निर्माण होण्याची शक्यता. मुलींकडून प्रगतीपर वार्ता कळतील.

सिंह - आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल मानसिक स्वास्थ्य संपणार आहे. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांना बरोबर चे संबंध सुधारतील.

कन्या - आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसाय धंद्यात एखाद्या फायद्याचा सौदा हाती घेईल नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल परंतु राजकारण आणि गटबाजी पासून दूर राहण्यातच हित आहे .

तुळ - स्थावर मालमत्ते विषयी ची कामे मार्गी लावू शकाल. या कामात ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील. कुटुंबांमधील सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. नोकरीत आपले काम करण्यात कसूर ठेवू नका. शिस्त पाळा.

वृश्चिक - व्यवसाय धंद्यातून आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल जुनी येणी वसूल होतील. भागीदारी व्यवसायात भागीदाराची अपेक्षित साथ मिळेल. व्यवसाय धंदा निमित्य जवळचे प्रवास करावे लागतील.

धनु -आपल्या कुटुंबात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद घडण्याची शक्यता आहे त्यामुळे वादविवाद टाळणे हिताचे ठरेल जाणून-बुजून लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा .

मकर - तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल जिद्द व चिकाटीने आपल्यासमोरील कामे पूर्ण करू शकतात व्यवसाय धंद्यात सरकारी कायदे तसेच नियम कसोशीने पाळा.

कुंभ - महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता प्रयत्न चालू ठेवा कोणावरही राग काढू नका कोणाचाही अपमान करू नका. सुसंवाद आणि समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करा. इतरांची मते समजून घ्य..

मीन - व्यवसाय धंद्यातील आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे जुनी उधारी वसूल होईल नोकरीमध्ये पदोन्नती अथवा वेतन वृद्धि सारख्या घटना घडू शकतात. इतरांना दुखावू नका.

logo
marathi.freepressjournal.in