१४ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
१४ मे'चे राशीभविष्य!

मेष - विद्यार्थ्यांना चांगला दिवस विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळेल. योग्य मार्गदर्शन मिळेल. प्रवास होतील. एखादी चांगली बातमी कळेल. त्यामुळे उत्साह वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे.

वृषभ - आर्थिक आवक चांगली राहील प्रगतीला पोषक असा दिवस आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. नातेवाईक आप्तेष्ट यांच्या भेटीगाठी होतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. कामाचा ताण जाणवेल.

मिथुन - अचानक धनलाभ होण्याची शक्यता. एखादे महत्त्वाचे काम पूर्णत्वास जाईल. महत्त्वाच्या कामात ओळखी मध्यस्ती उपयोगी येतील. नोकरीत बदलीची शक्यता. काहींच्या कामात बदल होऊ शकतो.

कर्क - कुटुंबात अथवा परिवारात व आपल्या कार्यस्थळी वाद विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करू नका. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळवावे लागेल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील.

सिंह - नियोजित कामे मार्गी लागतील. इतरांची मदत मिळू शकते. वाद-विवाद टाळणे श्रेयस्कर ठरेल. नोकरीत राजकारण आणि गटबाजीपासून दूर राहा. विचलित न होता आपले निर्णय घेणे गरजेचे ठरेल.

कन्या - जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. काहींना जवळचे प्रवास करावे लागतील. नोकरीत तडकाफडकी निर्णय घेणे चुकीचे ठरेल. थोडा संयम ठेवा.

तुळ - व्यवसाय-धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील. आर्थिक आवक उत्तम राहील. मालमत्तेच्या व्यवहारात फायदे होतील. समाजसेवा करण्यात रस घ्याल. छोटेखानी समारंभात सहभागी व्हाल.

वृश्चिक - रोजच्या कामात बदल घडतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. विविध मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. घरात काही वाद होतील. गैरसमजाचे वातावरण राहील. हितशत्रू डोके वर काढू शकतात.

धनु - भाग्याची अनुकूलता लाभेल. कौटुंबिक सुख मिळेल. नोकरीत बदलीची किंवा कामात बदल होण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगल्या बातम्या कानावर येतील. प्रवासात काळजी घ्या.

मकर - नोकरी व्यवसाय धंदा यांच्या निमित्ताने प्रवास होतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. वाहन सुख मिळेल. घरात मतभेदांची शक्यता. गैरसमज होण्याची शक्यता आहे. फाजील आत्मविश्वासही नको.

कुंभ - दैनंदिन कामावर तीर्थ इतरही कामे करणे गरजेचे ठरेल. स्वतःची कामे स्वतः करा. संयम सोडू नका. रागाला आवर घाला. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आ.हे अनावश्यक खर्चाला कात्री लावा.

मीन - कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना ते शांतपणे घेणे आवश्यक. घाईगर्दीत निर्णय घेऊ नका. नुकसानकारक ठरू शकते तसेच आर्थिक व्यवहारात सतर्क राहणे जरुरीचे.

logo
marathi.freepressjournal.in