१२ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
१२ मे'चे राशीभविष्य!

मेष - आनंददायी दिवस जाईल. नोकरीमध्ये दिलासा मिळेल नोकरदारांनी आपले काम व आपले कर्तव्य याच्याशी प्रामाणिक राहावे मानसिक प्रसन्नता जाणवेल. पर्यटन स्थळी जाण्याचा बेत आखाल.

वृषभ - नोकरीत प्रगती व उन्नती होईल काही सुखद प्रसंग घडतील मात्र सर्व बाबतीत शांततेने राहिल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा नावलौकिकात भर पडेल .

मिथुन - नोकरदारांना दिलासा मिळून एखादी चांगली बातमी कानावर येईल मात्र वादविवादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्या शेती तसेच कोर्टकचेरीच्या कामांना गती मिळेल. प्रवास योग घडतील.

कर्क - तुमच्या कामात काही कारणांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात त्यातून मार्ग काढावा लागेल, नाराज न होता प्रयत्न चालू ठेवणे हितकारक ठरेल इतरांना दोष देऊ नका स्वतः कामाशी प्रामाणिक रहा.

सिंह - गृहसौख्य मिळेल नोकरदारांना दिलासा मिळेल कलाजगत मनोरंजन हॉटेल कपडे व्यवसाय करणाऱ्या जातकांना प्रगतीची संधी नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल.

कन्या - महत्त्वाच्या कामामुळे धावपळ करावी लागेल काहींना अचानक धनलाभ संभवतो प्रवासात धगधग होऊ शकते अनोळखी व्यक्ती पासून सावध राहा नोकरीत आपले वर्चस्व राहील.

तुळ - व्यवसाय-धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील आर्थिक आवक उत्तम राहील मालमत्तेच्या व्यवहारात फायदे होतील. जुने मित्र तसेच नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. सामाजिक कार्यात रस घ्याल.

वृश्चिक - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका प्रवास करावे लागतील प्रवासात काळजी घ्या विरोधकांच्या तसेच हितशत्रूंच्या कारवाया वाढतील थोडा ताण तणाव वाटेल. क्रोध नियंत्रणात ठेवा.

धनु - आर्थिक स्थिती समाधानकारक राहील विविध मार्गांनी धनलाभ होऊ शकतात मालमत्तेची कामे फायद्यात राहतील व्यवसाय-धंद्यात लाभ होतील मनात अनामिका चींता घर करुन राहू शकते.

मकर - नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास घडतील काही वेळेस अंदाज चुकू शकतात भावंडांच्या भेटीगाठी होतील वाहन सुख मिळेल कुटुंबात थोडी वादावादी अथवा गैरसमज होतील.

कुंभ - नोकरी व्यवसायात योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळेल अनुकूल घटना घडतील आर्थिक स्थिती चांगली राहील परंतु कामाचा व्याप वाढल्यामुळे स्वभावात चिडचिडेपणा होऊ शकते संयम सोडू नका

मीन - आर्थिक स्थिती चांगली राहील नोकरी-व्यवसायात आपले स्वतःचे वर्चस्व राहील वरिष्ठांचे तसेच हाताखालच्या लोकांचे सहकार्य मिळेल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in