१३ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
१३ मे'चे राशीभविष्य!

मेष - कुटुंबातील मुलींकडून शुभवार्ता समजतील नोकरदारांना दिलासा मिळेल कामाचा उत्साह द्विगुणित होईल मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा मनोरंजनासाठी खर्च कराल बौद्धिक व रचनात्मक कामात व्यग्र रहाल.

वृषभ - स्थावर बाबतचे प्रश्न मार्गी लागतील प्रवासाचे योग येतील आर्थिक बाबतीत संबंधित व्यक्तींना सफलता मिळेल मात्र वाद विवाद काढलेले बरे आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील व त्यांचे सहकार्य मिळेल.

मिथुन - अनुकूल प्रसंग घडतील नोकरदारांना दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला चांगला काळ असून आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक.

कर्क - कोणताही लहान मोठा निर्णय घेताना सर्व बाबतीत योग्य विचार करून वागण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. विशेषतः सरकारी नोकरीत लहान मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा.

सिंह - अचानक धनलाभ होऊ शकतो आर्थिक आवक चांगली राहील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका प्रवास करावे लागतील प्रवासात काळजी घ्या जुने मित्र तसेच नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

कन्या - आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल जुने मित्र भेटतील भेटतील जुन्या आठवणीत रमाल एखाद्या छोटेखानी समारंभाचे नियोजन होईल. नोकरीत बदल संभवतो काहींच्या कामात बदल होईल.

तुळ - अचानक प्रवासाचे बेत ठरतील नोकरीमध्ये राजकारण व गटबाजी कडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करा कुटुंबात अचानक पाहुणे येऊ शकतात. त्यांच्या कामासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागेल.

वृश्चिक - भागीदारी व्यवसायात भागीदार बरोबर मतभेद संभवतात त्यामुळे वादविवाद टाळा. मालमत्तेच्या व्यवहारात फायदे होतील भावंडांना मदत कराल कामाची दगदग जाणवेल.

धनु - दैनंदिन कामकाजामध्ये वेग रहाल नोकरदारांना दिलासा मिळेल कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता प्रवासाचे योग वादविवादाचे प्रसंग टाळा.

मकर - नोकरीत अतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागेल. प्रवास घडण्याची शक्यता प्रवासात वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण आवश्यक आहे वाहतुकीचे नियम पाळा कुटुंबांमधील वातावरण चांगले राहील.

कुंभ -आर्थिक आवक चांगली राहील मात्र कोणतेही लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची गरज. वेळप्रसंगी तज्ञ मंडळींचा सल्ला उपयोगी पडू शकतो.

मीन - आर्थिक स्थिती चांगली राहील. रोजची कामे सुलभरीत्या पार पडतील मनात थोडी काळजी तसेच हुरहुर राहील काहींना वादविवादाला सामोरे जावे लागेल.

logo
marathi.freepressjournal.in