१५ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
१५ मे'चे राशीभविष्य!

मेष - कुटुंब परिवारात उत्तम वातावरण राहील. मुलांकडून शुभवार्ता ऐकण्यास मिळतील. नोकरदारांना नोकरीत दिलासा मिळेल. कामाचा उत्साह द्विगुणित होईल. मनोरंजनासाठी खर्च वाढेल.

वृषभ - वेगवेगळ्या मार्गांनी धन आगमन होऊ शकते. आर्थिक बाबतीत संबंधित व्यक्तींना सफलता मिळेल. आप्तेष्टांच्या तसेच नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. प्रवासाचे योग आहेत.

मिथुन - एकाच वेळेस अनेक विचार मनामध्ये घोळत राहतील. गोंधळून जाऊ नका विविध गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. नोकरी दिलासा मिळेल खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

कर्क - चांगला दिवस, एकूण ग्रहमान काहीशी साथ देणारे असल्याने विविध घरगुती तसेच बाहेरील कामे पूर्ण करता येतील. दांपत्य जीवन चांगले राहील. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल.

सिंह - काही सुखद प्रसंग घडतील. अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना नोकरीमध्ये दिलासा मिळू शकतो. कलाक्षेत्राला चांगला काळ असून आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल.

कन्या - आपल्या स्वतःच्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण आवश्यक. भेटवस्तू मिळण्याची शक्यता. प्रवासाचे योग आहेत. सहकुटुंब सहपरिवार अथवा मित्रमंडळ यांच्या समावेत प्रवासाचा बेत आखाल.

तुळ - व्यवसाय धंद्याच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतात. नवीन वाहन खरेदी करू शकाल. वाहन योग आहे. जवळच्या मित्रमंडळींमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता .वादविवाद टाळा.

वृश्चिक - एकूण सर्वच बाबतीत शांततेने राहिल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होणे शक्य आहे. नोकरीत प्रगती आणि उन्नती होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. दाम्पत्य जीवनात सुख मिळेल.

धनु - भाग्याची अनुकूलता राहील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. आरोग्याची काळजी घ्या. काहींना जवळचे तर काहींना दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवास कार्यसाधक राहतील.

मकर - लहान मोठ्या मोहापासून शक्यतो दूर राहा. नको त्या प्रलोभनाला बळी पडू नका. प्रेमप्रकरणात पुढचे पाऊल जपून टाका. कोर्टकचेरीच्या कामांना गती मिळेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या.

कुंभ - दिवस सर्वसामान्य राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल. स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर आणि व्यवहार कौशल्यावर कामात प्राविण्य मिळवाल. प्रवासाचे योग आहेत. हितशत्रू पासून सावध रहा.

मीन - दैनंदिन कामकाजात व्यग्र राहाल. नोकरदारांना नोकरीमध्ये चांगल्या वार्ता मिळू शकतात. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वादविवादाची शक्यता.

logo
marathi.freepressjournal.in