१६ मे'चे राशीभविष्य!

१६ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.

मेष - आर्थिक आवक उत्तम राहील. अनावश्यक खर्च करण्याकडे कल राहील तो टाळा. प्रवास करावा लागेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. गृहसौख्य चांगले राहील.

वृषभ - ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. आर्थिक बाजू चांगली भक्कम राहील. कामात यश संपादन कराल. सोप्या पद्धतीने कामे होतील नोकरीत बदलीची शक्यता आहे. वाद विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल.

मिथुन - कौटुंबिक सुख मिळून जीवनसाथी चांगली साथ देईल. प्रेमात यश संपादन करू शकाल. भाग्य साथ देईल. नोकरीत बदली होऊ शकते किंवा कामात बदल होऊ शकतो. प्रवासाची शक्यता.

कर्क - अचानक धनलाभ झाल्याने आश्चर्यचकित व्हाल. महत्त्वाच्या कामात अडचणी आल्यामुळे नाराज होऊ नका. त्या अडचणी दूर होतील तोपर्यंत संयम महत्त्वाचा ठरेल. घाईगर्दीत निर्णय घेऊ नका.

सिंह - नोकरी निमित्य प्रवास करावा लागेल. प्रवासात सावधानता बाळगा. धावपळीची शक्यता आहे. जीवनसाथी चांगली साथ देईल भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराचे मत परिणामकारक ठरू शकते.

कन्या - महत्त्वाची कामे दुपारनंतर होतील. नियोजनात यश मिळेल. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. व्यवस्थित नियोजन करून कामे करा . हितशत्रू पासून सावध राहा आपल्या कामात बिन चूक रहा.

तुळ - जवळचे प्रवास होतील. प्रवासात सावधानता बाळगा. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. आर्थिक आवक मनासारखी राहील.

वृश्चिक - आर्थिक बाजू सर्वसामान्य राहिल. काहींना प्रवास करावा लागेल. धनलाभाच्या दृष्टीने प्रवास सफल होतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील.

धनु - विचारात पाडणाऱ्या घटना घडू शकतात. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. ज्येष्ठांचा सल्ला व मार्गदर्शन मोलाचे ठरेल. घरीपाहुणे येण्याची शक्यता आहे. न‌‌‌वीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील .

मकर - नियोजित महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्नांची आवश्यकता भासेल. त्यासाठी प्रवासही करावा लागेल. लाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल. वादविवाद टाळा.

कुंभ - मन प्रसन्न राहील कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. सुवार्ता मिळतील. प्रेमात यश संपादन करू शकाल. महत्त्वाची कामे आटोक्यात येतील आरोग्य चांगले राहील नोकरीत आपले वर्चस्व राहील.

मीन - धार्मिक कार्यासाठी प्रवास करावा लागेल. व्यक्तींच्या गाठीभेटी होतील प्रवासात सावधानता बाळगा पैशाचा ओघ सुरू राहील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. संधीचा उपयोग करून घ्या.

logo
marathi.freepressjournal.in