२४ एप्रिलचे राशीभविष्य

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.

मेष - जवळच्या तसेच दूरच्या प्रवासाचे योग प्रयत्न केले तर कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसाय धंद्यात प्रगती कारक घटना घडू शकतात. एखादी चांगली बातमी कळेल.

वृषभ - रखडलेले महत्त्वाचे काम पूर्ण करावे. कामे सहजासहजी होतील. भाग्याची चांगली साथ राहील. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. मुलांच्या यशाच्या वाढता आनंदित करतील.

मिथुन - आपल्या कार्यक्षेत्रात अथवा कुटुंब परिवारात इतरांशी वाद-विवाद घडण्याची शक्यता आहे. ते टाळणे हिताचे ठरेल. गृहसौख्य चांगले राहील. प्रवासात नव्या ओळखी होण्याची शक्यता.

कर्क - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सोप्या पद्धतीने कामे होतील. जोडीदार आपली मते मान्य करेल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून वाद-विवाद घडतील. प्रवास होण्याची शक्यता. प्रवासात सावधान राहा.

सिंह - मन प्रसन्न राहील. आत्मविश्‍वास वाढेल. उत्साहात वाढ होईल. नवीन कल्पना सुचतील. प्रलंबित कामांना गती द्याल. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. धनप्राप्ती होऊ शकते, मात्र होणारे वादविवाद टाळा.

कन्या - वाहन सांभाळून चालवा वेगावर मर्यादा आवश्यक. जीवनसाथी सूर जुळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होतील.

तुळ - अनुकूल दिवस आहे. त्याचा फायदा घेतला पाहिजे. महत्त्वाच्या गाठीभेटी होऊ शकतात. घरातील वातावरण प्रसन्न राहील. नवीन नवीन संधी व्यवसाय-धंद्यात मिळू शकतो. जुनी येणी वसूल होतील.

वृश्चिक - सामाजिक कार्यात रस वाटेल. एखाद्या समारंभाला उपस्थित रहाल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. इतरांचा अपमान करू नका.

धनु - काहींना अचानक धनप्राप्ती होईल. काही लाभ होतील. जमीन जुमला तील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक समस्यांवर ती जास्त विचार करू नका जीवनसाथी बरोबर वादविवाद टाळा.

मकर - सहकुटुंब सहपरिवार पर्यटन अथवा देवदर्शन या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. प्रवासात मन आनंदी राहील. आर्थिक बाजू चांगली राहील जीवनसाथी चे वर्चस्व मान्य करावे लागेल.

कुंभ - आपल्या रागला आवर घाला रंगाचा बेरंग टाळा. महत्त्वाची कामे विलंबाने पूर्ण होण्याची शक्यता. खर्च वाढतील. आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. कायद्याची बंधने अवश्य पाळा.

मीन - तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल. कुटुंब परिवार जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. मुलांच्या प्रगतीपर बातम्या कानावर पडल्यामुळे वातावरण आनंदी राहील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in