२५ एप्रिलचे राशीभविष्य

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.

मेष - संघर्षातून यश मिळेल. अविरत प्रयत्न करावेत, पण अव्यवहार्य धाडस टाळा, वादविवादाला अधिक महत्व न देता कार्यरत राहणे महत्त्वाचे ठरेल. विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.

वृषभ - काही वेळेस अचानक खर्च करावा लागेल. कौटुंबिक जीवनात अनुकूल घटना घडतील. व्यवसायिकांना नव्या संकल्पना राबविण्यात यश लाभेल. नोकरी मधील वातावरण उत्साह वाढवेल.

मिथुन - धनप्राप्ती चांगली राहील. सरकार दरबारी रखडलेली कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल. आरोग्याची काळजी घ्यावी. जीवनसाथी कडून योग्य ते सहकार्य मिळेल. जवळच्या प्रवासाचे योग.

कर्क - दिवस थोडा सावधगिरीने वागण्याचा आहे. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. कामकाजाचे वेळापत्रक सांभाळावे लागेल. कौटुंबिक जीवनात वादविवाद टाळा.

सिंह - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कलेला वाव मिळेल. मानसन्मान प्राप्त होईल. कामानिमित्त प्रवास संभवतो. मित्रपरिवारात वाद-विवाद टाळणे गरजेचे राहील. समारंभांना उपस्थित राहाल.

कन्या - लहान-मोठ्या प्रसंगावरून होणारे वाद टाळले तर मनस्ताप होणार नाही. जमीन जुबल याबाबतची रखडलेली कामे गतिशील होतील. गृह कर्तव्या बाबत अधिक दक्ष राहावे लागेल.

तुळ - थोडा मानसिक ताण तणाव राहील. आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागेल. अनपेक्षित वाद विवाद निर्माण होऊ शकतात. ते टाळणे आवश्यक राहील. टोकाची भूमिका घेऊ नका.

वृश्चिक - आपल्या कार्यक्षेत्रातील नव्या योजना कार्यान्वित होतील. घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल. शत्रूंवर विजय मिळवाल. कुटुंबा मधून सुवार्ता मिळतील. जीवनसाथी ची साथ मिळेल.

धनु - आर्थिक व्यवहार जरा जपूनच करा. सभ्यतेचा आवडणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. भागीदारी व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे. कुटुंबांमध्ये काही बाबीत तडजोड करावी लागेल .

मकर - आपल्या कार्यात मग्न राहणे इष्ट ठरेल. इतरांच्या भानगडीत मध्ये पडू नका. नोकरी व्यवसायातील गुप्त शत्रूंच्या कारवायात वाढ होऊ शकते. गाफील राहू नका. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ - महत्त्वाच्या कामात आपल्या प्रयत्नांमुळे यश संपादन करता येईल. मिळणाऱ्या यशाने हुरळून जाऊ नका. कर्तव्य दक्ष राहा कार्य सिद्धी चा आनंद समाधान व आर्थिक लाभ देईल.

मीन - वाद विवांता सामंजस्याने सोडवा. मनाविरुद्ध बाबी घडणार आहेत. परंतु नाराजी दर्शवली नका स्थावर विषयक व्यवहार लाभदायक ठरतील. तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. प्रेमात यश मिळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in