मेष - आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळेल. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. मात्र अनपेक्षित खर्च उभे राहतील. प्रतिष्ठेचे प्रश्न टाळणे महत्त्वाचे ठरेल.
वृषभ - समाजातील परिचित प्रतिष्ठित लोकांपासून काही लाभ संभवतो. हाती घेतलेली कामे मनाप्रमाणे पार पडतील. धनलाभ होईल. आर्थिक व्यवहारात अव्यवहार्य धाडस करणे टाळा.
मिथुन - आर्थिक नियोजन काटेकोरपणे करून अंमलात आणा. मनाजोगती प्रगती करू शकाल. आपल्याजवळील मौल्यवान वस्तू तसेच वाहने सुरक्षित जागी ठेवा. गहाळ अथवा चोरीची शक्यता.
कर्क - नोकरी-व्यवसायातील प्रतिकूलतेवर मात करून पुढे जावे लागेल. कार्यक्षेत्रात नव्या योजना आखाव्या लागतील. कामकाजात अपेक्षित प्रगती होण्यासाठी कामात अचूकता व सातत्य महत्त्वाचे आहे.
सिंह - आपली मते इतरांवर लादू नका. होणारे वादविवाद टाळा. कुठल्याही अव्यवहार्य मार्गाचा अवलंब करू नका. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
कन्या - कुटुंब तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात गैरसमज होऊ शकतात. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. कामानिमित्त जवळचे प्रवास होऊ शकतात.
तुळ - मैत्रीत व्यवहार किंवा व्यवहारात मैत्री यापासून अलिप्त राहा. भावनेच्या आहारी न जाता कर्तव्याला प्राधान्य द्या. अनुकूल घटना घडून मन सुखावेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.
वृश्चिक - लहानसहान कारणांवरून होणारे वादविवाद जाणीवपूर्वक दुर्लक्षित करा. आपल्या कार्यात एकाग्रता साधणे आवश्यक राहील. गुप्त शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवा. आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात.
धनु - व्यावसायिक नवीन योजना व नियोजन प्रत्यक्षात साकार होण्यास योग्य काळ आहे. आपण समोरील कामे वेगाने कराल. नवीन कामांची आखणी कराल.
मकर - कोणावरही अतिविश्वास ठेवणे घातक ठरू शकते. नोकरी- व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरू शकतो. आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज समोरच्या व्यक्तीला येणार नाही याची दक्षता घ्या.
कुंभ - आपल्या कृतीने अथवा बोलण्या-वागण्याने शत्रूंचा संकेत वाढ होणार नाही याची दक्षता घ्या. कुटुंबातील काही जणांच्या कृतीमुळे मनस्ताप होण्याची शक्यता. झटपट आर्थिक लोभाच्या मोहाला बळी पडू नका.
मीन - आपल्या क्षमतेनुसार जबाबदारी स्वीकारा. समोरच्या प्रस्तावावर विचार करून निर्णय घ्या. शारीरिक अस्वास्थ्यामुळे कामकाजाचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे.