२८ एप्रिलचे राशीभविष्य

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.

मेष - आपलं कार्यक्षेत्रातील आपले ठोकताळे व अंदाज अचूक ठरतील. आपली बाजू शांतचित्ताने मांडल्यास गैरसमज दूर करता येतील. कौटुंबिक सुख मिळेल.

वृषभ - खात्री झाल्याशिवाय आपण आपले मत त्वरित व्यक्त करू नका. व्यवसायातील उलाढाल वाढेल. उत्पन्नही वाढेल. काही कामानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील.

मिथुन - नवीन दिशा आणि नवीन मार्ग यांचा चांगला अनुभव येईल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे अपेक्षित साथ मिळेल. कामे सुरळीत पार पडतील. विरोधकांच्या कारवायांचे प्रमाण वाढणार आहे सावध रहा.

कर्क - आवडत्या प्रिय व्यक्तींचा सहवास लाभल्याने मनोमन सुखावून जाल. प्रेमात यश मिळून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.

सिंह - दैनंदिन कामात काटेकोरपणे नियोजन करावे लागेल. समोरची व्यक्ती आपला गैरफायदा, तर घेत नाही ना हे पहा. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील व्यवसाय धंद्यात धनलाभाची शक्यता.

कन्या - नोकरी व्यवसायात वरिष्ठांनी सोपविलेली जबाबदारी अधिक परिश्रम घेऊन पार पाडावी लागेल. वादविवादात किंवा चर्चेत वेळ वाया घालू नका. कायद्याची चौकट बाळा खर्चात वाढ होऊ शकते.

तुळ - आपल्या कामात सातत्य व एकाग्रता पाळून कामे पूर्ण करा. जाणीवपूर्वक इतर गोष्टी टाळा. वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. आपल्या अधिकाराच्या मर्यादा जाणून घ्या.

वृश्चिक - महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल. निकटचे व्यक्तींसोबत मतभेदाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता. आलेल्या अडचणींवर जिद्दीने मात कराल.

धनु - काही मानसिक दडपण येण्याची शक्यता आहे. शांतपणे आपल्या समोरील परिस्थितीचे आकलन करून निर्णय घ्या. इतरांना दुखवू नका, स्वतःच्या क्रोधाला आवरा.

मकर - आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले असले, तरी खर्चाचे प्रमाण वाढू शकते. अनावश्यक खर्चाला कात्री लावणे हितकारक ठरेल. प्रयत्नांना यश मिळू शकते. मतभेदाचे रुपांतर भांडणात होऊ देऊ नका.

कुंभ - उत्साहवर्धक व आनंददायी दिवस आहे. आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत मिळतील. मौजमजेची इच्छा पूर्ण होईल. योग्य संधी आणि कार्यतत्पर तिच्या जोरावर तुम्ही विरोधकांवर मात करू शकाल.

मीन - योग्य दिशेने व योग्य मार्गाने वाटचाल करून आपले इप्सित साध्य करू शकाल. विरोधकांना रोखण्यासाठी नवीन डावपेचांची आवश्यकता. आपल्या कामात दिरंगाई किंवा आळस नको.

logo
marathi.freepressjournal.in