२९ एप्रिलचे राशीभविष्य

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
Published on

मेष - आपल्या लहरी आणि हट्टी स्वभावाला काबूत ठेवले तर बऱ्याच गोष्टी आपण साध्य करू शकाल. आर्थिक बाबतीत अर्थ तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यावसायिक धोरणे आखावी.

वृषभ - कार्यक्षेत्रात दीर्घकालीन विकास योजनांचा अवलंब करणे लाभदायक ठरेल. हाती घेतलेली कामे कौशल्याने पूर्ण करता येतील. अनावश्यक खर्च नियंत्रणात आणावे लागतील.

मिथुन - भावनाविवश होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. कर्तव्यापासून अजिबात विचलित न होता मार्गक्रमण करत रा.हा एखाद्या लहानशा कामासाठी अधिक वेळ व पैसा लागू शकतो.

कर्क - प्रगतीचे नवीन मार्ग दिसू लागतील. थोरामोठ्यांची मर्जी संपादित करता येईल. रखडलेली काही आर्थिक व्यवहार मार्गी लागतील, मात्र सतर्क राहून मार्गक्रमण करणे इष्ट ठरेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

सिंह - कुटुंबात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. मुलांकडून काही सुवार्ता मिळाल्यामुळे समाधानी राहाल. व्यवसायात काही नव्या योजना कार्यान्वित होतील. कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या.

कन्या - आपले यश किर्ती डोळ्यात खुपणाऱ्या विरोधकांच्या मताला जास्त महत्त्व देऊ नका. समाजातील प्रतिष्ठित व सन्माननीय व्यक्तींच्या भेटीगाठी फलदायी ठरतील. आर्थिक उलाढाली ला गती मिळेल.

तुळ - आरोप-प्रत्यारोप करण्यात आपली शक्ती व वेळ वाया न घालवता सकारात्मकतेने कामात लक्ष केंद्रित करा. विरोधकांवर ती विजय मिळवता येईल. निर्णय शांतपणे घेणे हितकारक ठरेल.

वृश्चिक - कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी मिळतील नवीन आलेली आव्हाने एक संधी म्हणून स्वीकारा दुसऱ्याला शब्द देताना दहा वेळा विचार करा आपल्या क्षमतेच्या मधील कामे स्वीकारा.

धनु - आज प्रगतीचा आलेख सरता असेल. नोकरी व्यवसाय धंद्यात तुमच्या कर्तुत्वाने नावलौकिक होईल. कोणत्याही आमिषाला बळी न पडता झटपट लाभाचा मार्ग स्वीकारणे धाडसाचे ठरू शकते.

मकर - कोणावरही अति विसंबून राहू नका. आप्तेष्ट नातेवाईक यांच्याबरोबर दिली संबंधात काही बाधा येणार नाही याची काळजी घ्या बागी दादा बरोबरचे मतभेदाचे प्रसंग चातुर्याने टाळा.

कुंभ - नवीन स्वीकारलेल्या आव्हानांवर ती मात करण्यासाठी आपण सक्षम राहणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी पडेल. फळाची अपेक्षा न करता कार्य करत राहावे.

मीन - आपल्या कार्यात एकाग्रता ढळू देऊ नका. परिस्थितीनुसार आपल्या विचारांची दिशा बदलावी लागेल. कोणत्याही गोष्टींची खातरजमा केल्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. संयम उपयोगी पडेल.

logo
marathi.freepressjournal.in