३ मेचे राशीभविष्य

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.

मेष - कौटुंबिक सौख्य लाभून संततीकडून त्यांच्या प्रगती पर बातम्या मिळतील व्यवसाय-धंद्यात जुनी येणी वसूल होतील आत्मविश्वासात वाढ होऊन जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ - आरोग्य उत्तम राहून उत्साहात भर पडेल दैनंदिन आपली रोजची कामे आपण वेळेवर पूर्ण करू शकाल काही महत्त्वाच्या गाठीभेटी झाल्यामुळे दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करता येतील.

मिथुन - महत्त्वाची कामे दुपार पूर्वी उरकून घ्यावीत. नियोजनात आयत्या वेळेस काही महत्त्वाचे बदल करावे लागतील कुटुंबातून सहकार्य लाभेल सरकारी कामांना विलंब लागण्याची शक्यता.

कर्क - आपल्या कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे तसेच हाताखालील मंडळींचे सहकार्य अपेक्षित असलेले मिळेल आर्थिक लाभ होतील. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी काही नवीन खरेदी कराल.

सिंह - समाजातील थोरा मोठ्यांचे तसेच मान्यवरांचे आशीर्वाद आणि सहकार्य लाभेल. नवीन ओळखी होतील. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल गुरुकृपा होईल एखादी महत्त्वाची सकारात्मक वार्ता कामी येईल.

कन्या - आरोग्याच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता आहे प्रकृतीकडे तसेच खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवून पथ्यपाणी पाळा. संसर्गजन्य बाधे पासून जपा. हितशत्रूंच्या कारवाया वाढण्याची शक्यता.

तुळ - नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल नोकरीच्या कामासाठी प्रवास करणे आवश्यक ठरेल. वरिष्ठांची मर्जी संपादित करता येईल.

वृश्चिक - आजच्या दिवशी खर्चाच्या प्रमाणात अचानक झालेल्या वाढीमुळे आश्चर्यचकित व्हाल अनावश्यक खर्चाला कात्री लावणे हितकारक ठरेल काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनु - आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण करू शकाल कार्यमग्न रहा शासकीय स्वरूपाच्या कामांमध्ये यश संपादन करता येईल पण त्यासाठी वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होण्याची शक्यता.

मकर - सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस उत्पन्न होईल एखाद्या सार्वजनिक कार्यात सक्रीय योगदान देण्याच्या विचारात असाल सामाजिक मान सन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ - जिद्द व चिकाटीने आपल्या समोरील कामे आपण पूर्ण कराल त्यासाठी जास्त प्रयत्न सुद्धा कराल मात्र आपल्या रागावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे शांतपणे निर्णय घ्या.

मीन - व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील आर्थिक परिस्थिती सुधारेल आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्यशैली मुळे व दक्षतेमुळे काही महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in