मेष : सफल प्रयत्नांचा आनंद मिळवून देणारा दिवस आहारावर नियंत्रण ठेवणे योग्य मित्रपरिवारात तुमच्या शब्दाला मान मिळेल प्रवास करू शकाल कुटुंब परिवारात वादविवादाचे प्रसंग चातुर्याने टाळा.
वृषभ : इतर कोणावरही महत्त्वाच्या कामां बाबत विसंबून राहू नका अतिविश्वास धोकादायक ठरू शकतो कार्यक्षेत्रात चांगल्या संधी चालून येतील अपेक्षित यश पदरी पडेल. नोकरीमध्ये यशदायक घटना घडतील.
मिथुन : कार्य व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ करावी लागेल स्वतःच्या आवाक्या बाहेरची आश्वासने देणे टाळा.कोणताही लहान-मोठ्या आमिषाला बळी पडू नका कामामध्ये मनाजोगते यश मिळेल
कर्क : इतरांनी दिलेल्या अनाहुत संघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपली वाटचाल सुरू ठेवा प्रतिष्ठेच्या उपक्रमात गुप्तता पाळावी लागेल मात्र काही तडजोडी कराव्या लागतील मनस्वास्थ्य मिळेल.
सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढेल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल घरात शुभकार्याचा योग संभवतो आपल्या बोलण्यातील कटुता टाळणे हिताचे ठरेल. आर्थिक आलेख उंचावेल.
कन्या : यशदायी दिवस. नोकरी विषयक केलेल्या प्रयत्नांना यश लागून नोकरी मिळू शकते कामात उत्साह आणि उमेद वाढून व्यवसायात सुद्धा प्रगती होईल. जुनी येणी वसूल होतील आरोग्याची काळजी घ्या.
तुळ : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो हे लक्षात ठेवा विरोधकांच्या बोलण्याने विचलित न होता प्रत्येक कृती विचारपूर्वक करावी लागेल घरात आनंददायी सुखावह वातावरण लाभेल.
वृश्चिक : नातेवाईक यांच्याबरोबर वाद-विवाद अधिक चिघळणार नाही याची खबरदारी घ्या एखादी अप्रिय घटना कानी आली तरी संयम बाळगा इतरांच्या आश्वासनांवर विसंबून राहू नका .
धनु : कौटुंबिक वाद विवाद त्वरित मिटवणे हिताचे ठरेल तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आर्थिक गुंतवणूक केलेली बरी व्यवसाय धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील.
मकर : आज आपल्या प्रगतीचा वेग वाढवू शकतो कार्यक्षेत्रात नव्या योजनांना गती मिळेल कौटुंबिक पातळीवर कुरकुरीत मुळे थोडी मानसिक अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे.
कुंभ : आर्थिक आवक चांगली राहील आपल्या खासगी बाबींची इतरांकडे चर्चा करणे टाळा कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळेल नव्या संधी प्राप्त होतील प्रसिद्धी मिळून नवीन कामे मिळतील.
मीन : शिस्त- संयम व कष्ट करण्याची तयारी असल्याने आज आपला प्रगतीचा वेग वाढेल केलेल्या आर्थिक नियोजनाचा फायदा होईल प्रवास संभवतात परंतु प्रवासात काही वेळेस अडचणी उद्भवतील.