४ मेचे राशीभविष्य

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.

मेष - रोजची दैनंदिन कामे लवकर पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढल्यामुळे आपल्या महत्वाच्या कामांना वेळ देऊ शकाल. व्यवसायात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

वृषभ - नोकरीमध्ये हाताखालील लोकांचे तसेच वरिष्ठांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. केलेल्या नियोजनात काही बदल करावे लागतील. वरिष्ठांचे म्हणणे ऐकावे लागेल.

मिथुन - कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या विवाहामधील अडथळे दूर होतील तसेच संततीचे असलेले प्रश्न मार्गी लागतील. आप्तेष्ट व नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.

कर्क - नियोजनाद्वारे हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. परंतु त्यासाठी कार्यमग्न राहणे आवश्यक ठरेल, तसेच कोणाबरोबरही वाद-विवाद करू नयेत. मतभेदाची शक्यता.

सिंह - जिद्द व चिकाटीने आपल्यासमोरील कामे पूर्ण कराल. नोकरीमध्ये तसेच व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आयत्या वेळेस काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

कन्या - कौटुंबिक जीवनात सुसंवाद व समन्वयाने कार्य साधाल. व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन उधारी करू नका.

तुळ - आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहून कुटुंबात एखादी महत्त्वाची सकारात्मक वार्ता मिळेल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील.

वृश्चिक - महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काही कारणास्तव जवळचा तसाच दूरचा प्रवास घडेल. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील, तसेच महत्त्वाची कागदपत्रे जपा.

धनु - एखादा अप्रिय निर्णय स्वीकारावा लागल्यामुळे मनोबल कमी होईल, परंतु नाराज होण्याची गरज नाही. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आप्तेष्ट तसेच मित्रमंडळींत वेळ जाईल.

मकर - नोकरीमध्ये अथवा व्यवसाय-धंद्यात अनुकूल वातावरण राहील. मात्र आपल्या बोलणे, वागण्यावर नियंत्रण आवश्यक आहे, तसेच रागावर नियंत्रण ठेवून कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका.

कुंभ - स्वतःच्या कार्यक्षेत्रात उत्तम स्थिती राहून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. निरनिराळ्या नवीन संधींचा लाभ होईल. मात्र शांतपणे आणि पूर्ण विचारांती निर्णय घेण्याची आवश्यकता.

मीन - कौटुंबिक सुख लाभून जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील.

logo
marathi.freepressjournal.in