५ मेचे राशीभविष्य

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
Published on

मेष - आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे सुरळीत होण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता भासेल ओळखी मध्ये तीन चा उपयोग होईल. लहान-मोठे प्रवास घडण्याची शक्यता.

वृषभ - अपेक्षित पत्रव्यवहार सफल होतील. समाजातील मान्यवरांच्या गाठीभेटी होऊन महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. आरोग्य चांगले राहील. काही नवीन उपक्रमांची सुरुवात करू शकाल.

मिथुन - मनोबल उत्तम राहून आपल्या बोलण्याची छाप इतरांवर पाडण्यात यश मिळेल महत्त्वाची कामे होतील. दीर्घकाळ रखडलेली व्यावसायिक येणी वसूल होतील मात्र कुटुंबात वाद-विवाद टाळावे.

कर्क - नोकरीमध्ये व्यवसाय धंद्यात नवीन सुसंधी लागतील. व्यवसायाच्या ठिकाणी नवीन संकल्पनांचा वापर सफल होईल नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभून सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

सिंह - आपल्या आजूबाजूला गतिशील घटना घडतील. दीर्घकाळ रखडलेली महत्त्वाची कामे गतिमान होतील विशेषतः स्थावर मालमत्ते विषयी ची कामे पूर्ण करू शकाल. मित्रमंडळी मदत करतील.

कन्या - कुटुंबांमधील काही प्रश्न चर्चेने व समन्वयाने सोडवाल जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल तुमच्या शब्दाला कुटुंबामध्ये मान राहील. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या मताला प्राधान्य मिळेल.

तुळ - आपल्या कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ करण्याची गरज भासेल परंतु धावपळीमध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंकडे नीट लक्ष द्या तसेच महत्त्वाची कागदपत्रे जपा गहाळ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - कुटुंबामध्ये चांगले वातावरण राहून कुटुंबातील मुला मुलींकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा बातम्या कानावर आल्यामुळे आनंद वाटेल संततीचे प्रश्न मार्गी लागतील. खर्च वाढण्याची शक्यता.

धनु - राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या जातकांनी आपल्या वर्तणूक आणि बोलणे आवडते नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे विरोधक प्रबळ होतील. सार्वजनिक क्षेत्रात आपल्या कामाची छाप पडेल.

मकर - कुटुंब परिवारात एखादे मंगल कार्य ठरू शकते नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. गुरुजनांचे सहकार्य लाभेल.

कुंभ - व्यवसाय धंदा नोकरीतील रखडलेली कामे पूर्ण करू शकाल कामगारांचे सहकार्य लाभेल मात्र सरकारी कायदे व नियम पाळण्याची आवश्यकता. कुटुंबासाठी नवीन गोष्टींची खरेदी करू शकाल.

मीन - रोजच्या जीवनात तुमचे मनोबल वाढवणारी एखादी घटना घडल्यामुळे आश्चर्य वाटेल दिनक्रम बदलू शकतो. उत्साह व आनंद वाटेल. कौटुंबिक सुख लाभेल.

logo
marathi.freepressjournal.in