६ मेचे राशीभविष्य

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.

मेष - कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढल्याने कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. एका वेळेस एकाच कामाला महत्त्व द्या. खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल, पण उत्पन्नही वाढेल.

वृषभ - कुटुंबातील तरुण-तरुणींच्या विवाहबद्दल वाटाघाटी यशस्वी होतील. नातेवाईक आप्तेष्ट यांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. संतती सौख्य लाभून कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

मिथुन - मानसिक स्वास्थ्य लाभल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण कराल. नोकरीधंद्यानिमित्त जवळच्या प्रवासाचे योग येतील. आपल्या समोरील कामे जिद्द व चिकाटीने पूर्ण करा.

कर्क - नातेवाईक तसेच मित्रमंडळींना आपल्या मदतीची गरज भासेल. आपण ती मदत उपलब्ध करून द्याल. आपल्या कार्यक्षेत्रात आपण आत्मविश्वासाने कार्यरत राहणार आहात.

सिंह - महत्त्वाची आर्थिक कामे पूर्ण करू शकाल. जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक फायदा करून देतील. नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा होईल, मात्र तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक ठरेल. धनलाभाचे योग.

कन्या - दैनंदिन कामात सुयश लाभल्यामुळे उत्साह वाढेल. आपल्या समोरील कामे आपण वेगाने पूर्ण करू शकाल. काही बाबतींत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नुकसान संभवते.

तुळ - अचानक खर्च वाढेल. अनावश्यक खर्चाला कात्री लावणे हितकारक ठरेल. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे, परंतु आपण गोंधळात न पडता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हितकारक ठरेल.

वृश्चिक - व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभ संभवतो. नवीन करार ठरू शकतात. त्यासाठी जवळचे प्रवास करावे लागतील. जुनी व्यावसायिक नाती नव्याने प्रस्थापित होतील.

धनु - रखडलेली कामे मार्गी लावाल. त्या कामांसाठी ओळखी, मध्यस्थी उपयोगी पडतील. इतरांची मदत मिळेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होऊ शकतात. कुटुंबात एखाद्या कार्याचे नियोजन होईल.

मकर - कुटुंबाह लहान-मोठ्या प्रवासाचे योग संभवतील. रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. स्थावर मालमत्तेविषयीचे असलेले वाद संपुष्टात येतील.

कुंभ - काही वेळेस अप्रिय निर्णय स्वीकारावे लागतील. त्यामुळे मनस्ताप होण्याची शक्यता. शांतपणे परिस्थितीचे अवलोकन करून महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कोणाशीही वादविवाद करू नका.

मीन - आरोग्य उत्तम राहील. यामुळे उत्साहाने आपल्या पुढील कामे पूर्ण करू शकाल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. कौटुंबिक सुख लाभेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in