७ मेचे राशीभविष्य

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.

मेष - महत्त्वाची अनुकूल घटना घडल्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंद द्विगुणित होईल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आपले कर्तृत्व सिद्ध करू शकाल. धनलाभाचा योग.

वृषभ - भाग्यकारक घटना घडल्यामुळे भाग्योदय होईल. धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकाल. व्यवसाय तसेच नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती अनुभवता येईल.

मिथुन - व्यवसायातील महत्त्वाची अडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील. जुने मित्रमंडळी भेटतील. महत्त्वाचे नियोजन करू शकाल. जवळचे तसेच दूरचे प्रवासाचे नियोजन होऊ शकते.

कर्क - सुसंवाद घडवून महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्याल. आपले अंदाज व निर्णय बरोबर ठरल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या कार्यात उपयोग होईल. व्यवसाय, नवीन संकल्पनांचा वापर सफल होईल.

सिंह - दैनंदिन कामे अडथळ्याविना पूर्ण होत असलेली बघून आश्चर्य वाटेल. धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांची निमंत्रणे मिळू शकतात. महत्त्वाचे स्थान अथवा पद मिळू शकते. आपले सक्रिय योगदान राहील.

कन्या - नोकरीमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्यामुळे काम सुकर होईल. इतरांचे मार्गदर्शन लाभेल. कामांमध्ये चालढकल करू नका. आपले कामाविषयीचे ज्ञान अद्यावत ठेवण्याची आवश्यकता आहे.

तुळ - मनोबल उत्तम राहून आरोग्यही चांगले राहील. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराच्या मताला प्राधान्य देणे हितकारक ठरेल. येणी वसूल होतील.

वृश्चिक - कार्यक्षेत्र वाढून कार्य व्याप्तीही वाढेल; मात्र आपल्या अधिकार कक्षेत काम करून आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. लहान मोठी प्रलोभने टाळणे हितकारक ठरेल.

धनु - महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कुटुंबात व आपल्या कार्यक्षेत्रात लहान मोठ्या कारणांवरून वाद-विवाद घडण्याची शक्यता असल्यामुळे कलहसदृश प्रसंग टाळणे हितकारक ठरेल.

मकर - जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. आपल्यासमोरील महत्त्वाची कामे वेगाने पूर्ण करू शकाल. व्यवसाय नवीन भागीदारीविषयी विचारणा होऊ शकते. अंदाज बरोबर ठरू शकतात.

कुंभ - अचानक खर्च करावा लागू शकतो. खर्चाचे प्रमाण वाढेल तसेच कार्यक्षेत्रात विरोधक, हितशत्रू इत्यादींचा त्रास संभवतो. आपल्या स्वतःच्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक तसेच हितकारक ठरेल.

मीन - काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. निर्णय घेताना इतरांचा सल्ला उपयोगी पडू शकतो. कौटुंबिक सौख्य लाभून कुटुंबातील मुला-मुलींकडून शुभवार्ता मिळतील. नोकरीविषयक प्रश्न मार्गी लागतील.

logo
marathi.freepressjournal.in