८ मेचे राशीभविष्य

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.

मेष - मनोबल उत्तम राहून आरोग्य उत्तम राहील. समोरील कामे आपण वेगाने पूर्ण करू शकाल. व्यवसायातील परिस्थिती समाधानकारक राहील. अनेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो.

वृषभ - कुटुंबात शुभवार्ता मिळतील. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मित्रमंडळींची मदत मिळेल. कामात ताण जाणवण्याची शक्यता आहे.

मिथुन - आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. व्यवसायातील रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आपली देणी चुकती करू शकाल. कुटुंबांमधील वातावरण समाधान कारक राहील.

कर्क - समाजातील मान्यवर तसेच गुरुतुल्य व्यक्तींच्या मार्गदर्शनाबरोबर सहवास लाभेल. मानसन्मानाचे योग. उत्साह वाढेल. कौटुंबिक सुख मिळून इतरांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल.

सिंह - मनोबल वाढवणाऱ्या घटना आजूबाजूस घडल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. निर्णय धाडसाने घ्याल. आरोग्य चांगले राहील. व्यवसाय-धंद्यात नवीन संकल्पना पोषक ठरतील.

कन्या - रोजच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिडचिड वाढण्याची शक्यता. महत्त्वाची कामे आज नको. खर्चातही वाढ होऊ शकते. शांतपणे निर्णय घेण्याची गरज.

तुळ - मन आनंदी राहील उत्साह वाढेल. नोकरीविषयक प्रश्न सुटून रोजगार मिळेल. मुलाखतीतून बोलावणे येऊ शकते. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल.

वृश्चिक - महत्त्वाची कामे पुढे ढकलावी. शक्यतो प्रवासही पुढे ढकलावा. सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देऊ शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी टिकवण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे.

धनु - बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळू शकते. आपल्याजवळील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मात्र इतरांना कमी लेखू नका तसेच आपल्या बोलण्यावर वर्तणुकीवर नियंत्रण ठेवा वादविवाद टाळा.

मकर - दीर्घकाळ रखडलेली शासकीय कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. ओळखीचा उपयोग होऊ शकतो. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राहील. एका वेळेस एकच कार्य करणे हिताचे ठरेल.

कुंभ - व्यवसायिक येणी आल्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. व्यवसायात काही महत्त्वाचे बदल करू शकाल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल आरोग्य चांगले राहील.

मीन - आर्थिक मदत लागल्यास तीही उपलब्ध होऊ शकेल. आपण घेतलेले निर्णय अचूक ठरतील. त्याचा आपल्याला व्यवसायात फायदा होईल. जोडीदाराची अथवा भागीदाराची साथ मिळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in