'२७ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
'२७ मे'चे राशीभविष्य!

मेष - आपल्या व्यक्तिमत्त्वाची समोरच्या व्यक्तीवर ती छाप पडेल. आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीला पटवून देण्यात यश मिळेल परंतु आपल्या बोलण्यामध्ये आक्रमकता कमी ठेवा.

वृषभ - पूर्वी केलेले नियोजन उपयोगी पडेल. आपल्या मतांवर खंबीरपणे उभे राहाल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्याने खर्च मनसोक्त कराल.

मिथुन - बरेच दिवस एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची आपण वाट बघत असाल तर ते काम आज पूर्ण होऊ शकते महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होऊन आपले कार्य पूर्ण करण्यात यश मिळेल.

कर्क - कामाची व्याप्ती वाढल्यामुळे कार्य मग्न रहाल. व्यवसाय धंद्यात जास्तीची जबाबदारी स्वीकारावी लागेल. अचानक काही सरकारी स्वरूपाची कामे उद्भवल्यामुळे धावपळ करावी लागेल.

सिंह - भागीदारीच्या व्यवसायात काही महत्वाचे निर्णयाबाबत भागीदार आपल्यावरती अवलंबून राहील शांतपणे व पूर्ण विचारांती निर्णय घेण्याची गरज. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

कन्या - आप्तेष्ट नातेवाईक अथवा मित्रमंडळी यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल मनोरंजनासाठी खर्च करावे काहींना प्रवासाचे योग आहेत. प्रवासाचे नियोजन होईल. आर्थिक परिस्थिती चांगली.

तुळ - स्वतःवर खर्च करण्याची इच्छा होईल मित्रमंडळींच्या मध्ये प्रिय व्हाल सामाजिक कार्यात मन रमेल. जवळचे प्रवास घडू शकतात पण प्रवासात अतिआत्मविश्वास व स्पर्धा टाळा. आर्थिक लाभ संभवतात.

वृश्चिक - व्यवसाय धंद्यामध्ये नवीन संकल्पनांचा तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास तो व्यवसाय साठी पोषक ठरून व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

धनु - नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील वेळप्रसंगी आपल्या मतास जरा बाजूला ठेवा. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.

मकर - कुटुंब परिवारात कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य बरोबर वादविवादाची शक्यता आहे. त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून आपली प्रतिक्रिया व्यक्त करा. मित्रमंडळींच्या सह मनोरंजनासाठी खर्च कराल.

कुंभ - दैनंदिन कामे सुकर होतील. सकारात्मक विचारांच्या व्यक्ती भेटल्यामुळे समाधान मिळेल महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.

मीन - अचानक धनलाभ होण्याची शक्यता व्यवसाय-धंद्यात जुनी येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल काही नवीन निर्णय घेऊ शकाल आपली देणी चुकती करू शकाल.

logo
marathi.freepressjournal.in