

डॉ. सविता महाडिक ज्योतिष भूषण
कुंभ
जीवनसाथीची साथ मिळेल
कुंभ रास ही शनी महाराजांची रास असून वायुतत्त्वाची राशी आहे. त्याचप्रमाणे ही रास बौद्धिक आहे. ही रास स्थिर आहे. एखादा निर्णय घेतला तर तो शेवटपर्यंत नीट पूर्ण करण्याकरिता दृढनिश्चय असतो. आपले निर्णय सहसा बदलत नाहीत. त्याचप्रमाणे कोणतेही निर्णय बुद्धीच्या सहाय्याने व व्यवहार कुशलतेने घेत असलेले दिसतात. संशोधकवृत्ती, संग्राहक वृत्ती, ज्ञानपिपासा, धारणशक्ती, बुद्धीची प्रकल्पता, अलौकिक स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, वक्तृत्व, परोपकार, धार्मिक अशा प्रकारचे श्रेष्ठ गुण निसर्गत:च असतात कुंभ राशीत. समतोलत्व आढळते.
शिक्षण :- शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेसाठी ग्रहमान चांगले आहे. आपणास अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळणार आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रातील अभ्यासासाठी अनुकूलता राहील. अपेक्षित यश मिळवता येईल. कला, क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा अनुकूलता मिळणार आहे. परदेशासंबंधी अभ्यासासाठी शिक्षणासाठी ग्रहमान उत्तम आहे. त्यामुळे योग्य प्रयत्नांना चांगले यश मिळेल. परिश्रम घेण्यात मागे राहू नका. आळस झटका.
पारिवारिक :- कुटुंबातील वातावरण उत्साही व आनंदी असेल. तसेच घरामध्ये नियमितपणा व शिस्त राहील. कार्य वेळेत पूर्ण होतील, घरातील सर्व सदस्यांचे सहकार्य राहील, परंतु कधी घरात गैरसमज होण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. बौद्धिक कौशल्य व आपले व्यवहार चातुर्य याच्या साह्याने आपण घरातील वातावरण चांगले ठेवण्यात यशस्वी व्हाल, आर्थिक दृष्टिकोनातून परिस्थिती चांगली राहील. सर्वांच्या गरजा पूर्ण होतील.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- आपलं दाम्पत्य जीवनात जीवनसाथी पूर्ण सहयोग देईल. जीवनातील प्रत्येक वळणावर आपल्याला आपल्या जीवनसाथीची साथ मिळेल. उभयतांमधील भावनात्मकतेमध्ये वृद्धी होईल. कुटुंबातील इतर सदस्यांचे वाढत्या प्रमाणात सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद व उत्सवाचे वातावरण राहील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. भावनेवर नियंत्रण आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायाच्या दृष्टिकोनातून भूमीभवन, जमिनीतून निघणारे खनिज पदार्थ, कृषी उपकरणे ,कृषी सामग्री इत्यादी संबंधित कार्यरत असलेल्या जातकांना त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. चिकित्सा क्षेत्रातील जातक आपल्या व्यवसायात चांगली प्रगती करू शकतील. व्यापार-व्यवसायात नवनवीन संधी चालून येतील. व्यवसायात जुनी वादग्रस्त येणी येतील. महिन्याच्या उत्तरार्धात जमीनजुमला, स्थायी संपत्तीमध्ये गुंतवणूक होऊ शकते. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणांचे विवाह ठरतील. ओळखीतून काहींचे विवाह होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. आपले स्वतःचे आरोग्य चांगले राहिल्यामुळे उत्साह वाढून हातातील कामे पूर्ण कराल.
शुभ दिनांक : ६, ८, ११, १२, १३, १५, २१, २५, २८, २९
अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१
मीन
सुवार्ता मिळतील
मीन रास ही गुरुतत्त्वाची रास आहे. ही रास जलतत्त्वाची आहे. त्यामुळे ती पाण्यासारखी प्रवाही आहे. मनात एक व कृतीत एक असे यांचे वर्तन असते. गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये बऱ्याचदा मानसिकता असते. लवकर निर्णय घेऊ शकत नाहीत. परस्परविरुद्ध गुणांचे मधुरमिलन या राशीमध्ये आहे. जलतत्त्वाची रास असल्याने सौंदर्य परिस्थितीनुरूप बदल करणे, मिळतेजुळते येणे, वगैरे ठळक जलतत्त्वाचे गुण या राशीमध्ये प्रामुख्याने दिसतात. मीन राशी असलेल्या जातकांमध्ये दुर्बलांवर आक्रमण करणे व प्रबलांशी नमते घेणे हे नैसर्गिक गुण आहेत तसेच भित्रेपणा, जलविहाराची आवड, सुंदर व टपोरे डोळे, चंचलता, तजेलदारपणा, आपल्याच जातबांधवांवर आपली स्वतःची उपजीविका करणे, असे गुण आहेत. मीन रास ही समरास असून स्त्री राशी आहे. सौम्यपणा, लज्जा, नम्रता हेही गुण आहेत. आत्मविश्वासाची कमी असते.
शिक्षण :- अभ्यास करताना कंटाळा येणे, याची शक्यता सध्याच्या कालावधीमध्ये अधिक आहे. त्यामुळे आळस झटका. नेहमीपेक्षा जास्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल, तर आपले यश आपल्याला मिळेल. इतर बाबतींत मात्र आपणास ग्रहांची साथ मिळणार आहे. कला, क्रीडा क्षेत्रात अपेक्षित यश प्राप्त होईल. सर्व क्षेत्रात आपणास चांगले यश मिळेल, प्रामाणिक कष्टांची आवश्यकता आहे. परदेशासंबंधित अनुकूलता असली, तरी प्रत्यक्षात सर्व बाबींत खात्री करून घेणे हितावह ठरेल. म्हणजे यशाचा मार्ग प्रशस्त होईल.
पारिवारिक :- परिवारातील सदस्यांमध्ये उत्साह राहणार आहे. त्यामुळे हातातील काम वेगाने संपवले जाईल. नवीन निर्णय घ्यावे लागतील. परिवारामध्ये एखादे मंगलकार्य घडेल अथवा मंगलकार्याचे नियोजन होऊ शकते. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह जमतील. कुटुंबातील सर्व व्यक्ती कार्यरत राहतील. सर्वांचे सहकार्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या चांगला कालावधी आहे. खर्चाचे प्रमाण वाढते राहील, पण उत्पन्नही चांगले राहील. त्यामुळे वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. घरात आध्यात्मिक वातावरण राहील. आपण आपल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- ग्रहमान आपल्याला सावध राहण्याचा इशारा देत आहे. आपल्याला अनपेक्षितपणे काही अप्रिय घटनांचा सामना करावा लागू शकतो. खोटे दोष अथवा लांच्छन आपल्यावर लादले जाऊ शकते. कोणत्यातरी घोटाळ्यात गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी अथवा आपल्या कार्यक्षेत्रात वरिष्ठांबरोबरचे संबंध सुधारण्यास प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरेल. नाहीतर त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. महिला कर्मचाऱ्यांपासून अलिप्त राहावे. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती जरी सामान्य दिसत असली तरी सरकारी कायदे घालून पाळा. कामात जास्तीचा वेळ व पैसा खर्च होऊ शकतो. अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक बाबतींत मिश्र फळे मिळू शकतात.
आपण ज्या प्रमाणात परिश्रम कराल त्यापेक्षा अल्प प्रमाणात फळे प्राप्त होण्याची शक्यता आहे नशीब आपल्याला साथ देत नाही अशी भावना निर्माण होऊ शकते. परंतु प्रयत्न कमी पडू देऊ नका. नशीब बदलण्यास वेळ लागत नाही जे विद्यार्थी व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी एकाग्रतेने व धैर्याने परिश्रम घेणे चालू ठेवावे यश निश्चितच मिळेल कौटुंबिक सुख प्राप्त होईल सुवार्ता मिळतील.
शुभ दिनांक : २, ८, ११, १२, १३, १५, २३, २८, २९
अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१