

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
सिंह रास
वैयक्तिक मोठे उत्कर्ष
सिंह राशीचा स्वामी रवी आहे. ही रास राज रास म्हणून ओळखली जाते. ही रास पुरुष तत्त्वाची असून विषम रास आहे. स्थिर राशी आहे. सिंह राशी म्हणजे अधिकार लालसा, सत्तेचा लोभ, कर्तृत्व, स्वावलंबत्व व राजेपणा हे सिंह राशीचे जन्मजात गुण आहेत. या राशीच्या व्यक्तींमध्ये धाडस व साहस असते. आत्मविश्वास भरलेला असतो. स्वकर्तृत्वाने सिंह राशी असलेले जातक पुढे येतात व यशस्वी होतात. प्रेम, शौर्य, निर्भयता, कर्तृत्व, स्वावलंबित्व, काटकपणा, दुसऱ्यावर हुकूमत चालवण्याची व अधिकार गाजवण्याची आवड असल्याने बदल जास्त आवडत नाहीत. प्रवास कंटाळवाणा असतो, अशी गुणवैशिष्ट्ये सिंह राशी असलेल्या जातकांमध्ये असतात.
शिक्षण :- शिक्षणासाठी ग्रहमान अनुकूल आहे. शिक्षण क्षेत्रातल्या कोणत्याही शाखेमध्ये आपण यशस्वी होऊ शकाल. टेक्निकल क्षेत्रात विशेष अनुकूलता असणार आहे, पण सातत्य व स्थिरता ठेवणे आवश्यक आहे, शिक्षणासंबंधी परदेशासंबंधी पण अनुकूलता लाभेल. परंतु प्रयत्न योग्य दिशेने हवेत. कालावधी अनुकूल असल्या कारणाने अपेक्षित यश मिळू शकेल.
पारिवारिक :- कुटुंबात चांगले व खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे. त्यामुळे उत्साह आणि आनंदामध्ये वृद्धी होईल. आर्थिक दृष्टिकोनातूनही कालावधी अनुकूल आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकाल. कुटुंबामध्ये आपल्या शब्दाला मान असेल. आपले मत किमती ठरेल. आनंद तसेच मनोरंजनासाठी अथवा मौल्यवान वस्तूंसाठी खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. त्याचप्रमाणे कुटुंबात वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागण्याची तयारी ठेवा. आपण या जबाबदाऱ्या पूर्ण आत्मविश्वासाने पार पाडाल. आपले व्यवस्थापन नियोजन चांगले ठेवणार आहात. त्यामुळे आपल्या सर्व गरजा पूर्ण होतील. त्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी तसेच उत्साही राहील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील तसेच विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- ग्रहमानातील वक्री ग्रहांचा परिणाम आपल्यावर होणारच आहे. हा परिणाम आपल्याला अपवादात्मक परिस्थितीतून नेणारा ठरू शकतो. आपल्या कार्यक्षेत्रावरही त्याचा परिणाम होईल. महत्त्वाच्या कामात बेरंग होऊन विलंबाची शक्यता. मात्र काही शुभ ग्रहांमुळे आपल्याला अनुकूलताही लाभणार आहे. त्याचा फायदा आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होऊ शकतो. चालू नोकरीमध्ये भाग्य संकेत मिळतील. आपण केलेल्या कार्याचे कौतुक होऊन गौरवास पात्र ठराल. सरकारी कामात काही समस्या जरी आल्या तरी त्यावर आपण मात करू शकाल. समाजातील प्रभावशील व्यक्तींचे मार्गदर्शन तसेच मदत मिळू शकते. विद्यार्थी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळवू शकतात. वाहन चालवताना ते काळजीपूर्वक चालवणे. आपल्या हातून दानधर्म होण्याची शक्यता आहे. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून जबाबदारी वाढणार आहे. व्यवसायामध्ये स्थिरता येईल.
शुभ दिनांक : - २, ५, ६, १५, २१, २५, २९
अशुभ दिनांक : - १, ४, १०, १७,१८,१९,२०,२७,३०,३१
कन्या रास
आपल्या कार्याचे कौतुक होईल
कन्या राशी बुधाची रास आहे. अर्थतत्त्वाची रास आहे. त्याचप्रमाणे पृथ्वी तत्त्वाची आहे. ही सम रास आहे. त्याचप्रमाणे स्त्री राशी आहे. व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा, हिशोबी व्यवहार, कुशलता, मोहक सौंदर्य, रेखीव व प्रमाणशीर अवयव रचना, चौकसपणा, धान्य संग्रहाची आवड, दुसऱ्यास मार्गदर्शन करण्याची उत्सुकता, दुसऱ्याचे पोषण करण्याची तयारी व कळकळ अशी प्रमुख वैशिष्ट्ये कन्या राशीत आढळतात. ही राशी द्विस्वभाव राशी असल्यामुळे वागण्या-बोलण्यात दुटप्पीपणा असू शकतो. ही बौद्धिक राशी आहे. या राशीमध्ये बुध व गुरू बलवान असतात. परंतु काही वेळेस आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे इतरांच्या सल्ल्याची गरज लागते.
शिक्षण :- टेक्निकल क्षेत्रातील शिक्षणासाठी विशेष अनुकूल कालावधी आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यास अभ्यास चांगला होईल. अपेक्षित यश मिळेल. स्पर्धात्मक यश मिळू शकते, मात्र अभ्यासात सातत्य व प्रामाणिकपणा हवा. वेळेचे नियोजन उपयोगी पडेल तसेच कुसंगत टाळा. पूर्ण लक्ष केंद्रित करून अभ्यास करावा लागेल. कला, क्रीडा क्षेत्रात अपेक्षित यश मिळवण्यासाठी जास्त सरावाची आवश्यकता आहे. नवनवीन संधी उपलब्ध होतील. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी चालून येईल. परदेशासंबंधी शिक्षणासाठी अनुकूल ग्रहमान असल्यामुळे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकता. योग्य प्रयत्न केल्यास चांगले यश प्राप्त कराल.
पारिवारिक :- आर्थिक बाबतीमध्ये कोणतेही प्रश्न येणार नाहीत. आर्थिक बाब चांगली राहिल्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. सगळ्यांच्या गरजा पूर्ण होतील किंवा आपण सगळ्यांच्या गरजा पूर्ण करू शकाल. नवीन गुंतवणूक होऊ शकेल. त्याचप्रमाणे खर्चाचे प्रमाण वाढू शकते. कुटुंबातील व्यक्तींबरोबर सुसंवाद साधणे गरजेचे ठरेल. कुटुंबात एखादे मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. विशेषतः नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येतील. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतीमधून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. कुटुंबातील सदस्यांमधील गैरसमज टाळून समजून घेतल्याने घरातील वातावरण समाधानकारक राहील. याबाबतीत आपले प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- परिवारात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूलता लाभल्याने आनंदाचे प्रसंग समोर येतील. त्यामुळे सगळीकडे अनुकूलता व्यापलेली आपल्याला दिसेल. आपल्या विचारात सकारात्मकता भरून राहील. व्यवसाय-धंद्याचाही विस्तार करू शकाल. भविष्यातील नियोजन आपण काही आपल्या जवळच्या व्यक्तींसह मिळून करू शकाल. कुटुंबातूनही आपल्याला त्यात मदत मिळू शकते. नवीन संकल्पना तसेच निरनिराळी माध्यमे यांचा यशस्वी वापर आपण करू शकाल. निरनिराळी संधी चालू झाल्यामुळे आपण संधीचा फायदा घ्याल.
शुभ दिनांक : - ६, ८, ११, १२, १३, १५,२१,२५,२८,२९
अशुभ दिनांक : - ४,१०,१७,१८,१९,२०,२७,३०,३१