

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
तुळ रास
दैनंदिन जीवनात परिवर्तनाची शक्यता
तुळ राशी शुक्राची रास आहे. ही चररास असल्याने चंचलता व प्रवासाची आवड असते तसेच सौंदर्य पूजक असतात. चविष्ट अन्नाची आवड असते ही विषम रास आहे. तसेच ती पुरुष रास असल्यामुळे या राशीमध्ये धाडस स्थैर्य धैर्य साहस यासारखे गुण जन्मतः असतात वायु तत्त्वाची रास आहे. बुद्धिमत्ता लाभलेली रास असल्यामुळे यांच्याकडे समाजातील लोक आकृष्ट होताना दिसतात. त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा समतोलपणा असतो. अन्यायाबद्दल चीड निर्माण होते बुद्धिमत्तेची राशी आहे. बुद्धिमत्ता दर्शक राशी असल्यामुळे हुशार असतात ही बौद्धिक राशी असल्याने समतोलपणाने न्यायप्रियता न्यायदान अशा प्रकारचे गुण स्वभावात असतात. परंतु यांची वृत्ती व्यापारी असते.
शिक्षण :- सध्याच्या कालावधीमधील ग्रहमान शिक्षण क्षेत्रासाठी अनुकूल राहील, तरीही आपणास सातत्याची व एका जागी बसून अभ्यास करण्याची गरज आहे. तसेच कुसंगत प्रत्कर्षाने टाळा वेळेचे नियोजन करा. इतरत्र वेळ वाया घालवू नका योग्य दिशेने प्रयत्न केल्यास आपल्याला अपेक्षित यश साध्य होईल. आपले प्रयत्न यशस्वी होतील विशेषतः टेक्निकल क्षेत्रामध्ये आपणास अपेक्षित यश प्राप्त करता येईल. तसेच कला व क्रीडा क्षेत्रात नवीन संधी मिळतील. परदेशासंबंधीच्या शिक्षणासाठी योग्य दिशेने प्रयत्न केल्यास त्यामध्ये अपेक्षित यश साध्य करता येईल.
पारिवारिक :- आपल्या परिवारात चांगले व खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातूनही अनुकूल कालावधी राहील. मात्र कुटुंब परिवारातील शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींच्या साठी विशेष खर्च करावा लागेल. तसेच राहत्या घरासाठी पण खर्च संभवतो. घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च कराल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. राहत्या घराबद्दलचे प्रश्न सुटतील परंतु कुटुंबातील सदस्यांच्यामध्ये एकोपा राहण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील गैरसमज टाळणे महत्त्वाचे ठरेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- आपल्या वाणीचा व बुद्धीचा विकास होऊन आपल्या कार्यकर्त्यांनी व बुद्धी कौशल्याने कार्य पूर्ण करा. नवीन कार्य मोठ्या उमेदीने आणि उत्साहाने हाती घ्या. हे जातक कम्युनिकेशन- बँकिंग क्षेत्रात कार्यरत असतील, अशा जातकांना अनुकूल कालावधी आहे. आपल्या दैनंदिन जीवनात परिवर्तनाची शक्यता. आर्थिक आलेख उंचावेल. हण्ड्लूम, होजरी टेक्स्टाईल या व्यवसायाशी जोडल्या गेलेल्या जातकांना आपल्या व्यवसायात प्रगती आणि उन्नती करण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. आयात निर्यात या क्षेत्राशी संबंधित असलेल्या जातकांना आपला व्यवसाय एका नव्या पातळी वरती नेऊन ठेवता येईल. नवे करार होऊ शकतात काही फायद्याचे सौदे हाती येतील. कायदेशीर क्षेत्रातील जातकांना चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता असेल. शिक्षण क्षेत्रात वाणिज्य विभागाशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. स्पर्धात्मक यश मिळेल. मित्र मंडळींच्या समावेत मोज मजेत वेळ घालवाल. कुटुंब परिवारात चांगले वातावरण राहील.
शुभ दिनांक : - ६, ८, ११, १ २, १५, २१, २५,२८,२९
अशुभ दिनांक : - १, ४,१०,१७,१८,१९,२०,२७,३०,३१
वृश्चिक रास
निरनिराळ्या क्षेत्रातून लाभ मिळेल
वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे. ही स्थिर राशी आहे त्यामुळे बदल लवकर करण्यास आवडत नाहीत प्रवासाची फारशी आवड नसते. ही राशी सम आहे स्त्री राशी असल्याने स्त्रीमधील गुण वृद्धिंगत होताना दिसतात. जलतत्त्वाची रास असल्यामुळे सौंदर्य हळवेपणा वगैरे प्रमुख गुण या राशीमध्ये दिसतात. मार्मिकता, एकांतप्रियता, गोडपणा, दुर्बलांवर आक्रमण करणे, प्रंबलांची नमते घेणे टीका करणे, गुप्त गोष्टीमध्ये विशेष रस असणे, अतिरेक, मर्म भेदकता तसेच बनकवडेपणा हे वृश्चिक राशीचे मूलभूत गुण आहेत. या राशीमध्ये परस्पर विरोधी व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती असू शकतात. जसे श्री रामचंद्र व रावण परस्परविरोधी असे व्यक्तिमत्त्व असू शकते.
शिक्षण :- शिक्षणासाठी आपणास अनुकूलन असले तरी त्यासाठी आपणास जास्त कष्ट घ्यावी लागणार आहेत. प्रयत्नात सातत्य हवे की कला क्रीडा क्षेत्रात अपेक्षित यश प्राप्त करता येईल. नवीन नवीन संधी मिळतील टेक्निकल क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. परदेशातील शिक्षणासाठी योग्य तऱ्हेने प्रयत्न करावे लागतील त्यामुळे यश मिळेल.
पारिवारिक :- कुटुंब परिवारामध्ये आर्थिकदृष्ट्या कालावधी अनुकूल राहील. घरात धार्मिक वातावरण असेल एखादे धार्मिक कार्य होईल किंवा धार्मिक कार्याचे नियोजन होईल. एखादे मंगलकार्य ठरू शकते. सहकुटुंब सहपरिवार धार्मिक स्थळे भेटी देण्याचे योग बनत आहेत. कुटुंब परिवारातील निरनिराळ्या कारणांसाठी खर्चाचे प्रमाण जास्त राहील. तसेच लहान सहान कारणांवरून समज गैरसमज होऊन वादविवाद घडल्यामुळे रंगाचा बेरंग होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी वादविवादापासून दूर राहा. कुटुंब परिवारातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्याल आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- आपल्या कर्मा द्वारे त्याचप्रमाणे भाग्याच्या साथीने आपल्याला निरनिराळ्या क्षेत्रातून लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन नवीन योजना कार्यान्वित होतील. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पुरेपूर प्रभाव पडेल. अर्धवट राहिलेली कार्य गतिमान होऊन मार्गी लागतील. जे जातक बँकिंग फायनान्स कमिशन एजंट इत्यादी क्षेत्रात कार्य करीत असल्यास अशा जातकांना विशेष लाभ. आपल्याला विरुद्धलिंगी व्यक्तीपासून धनलाभाची शक्यता मित्रमंडळीसह मौज मजेत वेळ घालवू शकाल. सहलीचे आयोजन होईल जे जातक आपले जुने वाहन बदलण्याच्या तयारीत असतील तर अशा जातकांना नवे वाहन खरेदी करता येईल. शेअर बाजार वायदे बाजार संबंधित जे जातक कार्यरत असतील त्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यवसाय धंद्यात लाभाचे सौदे हाती येतील. पारिवारिक जीवन
समाधानकारक राहील ते मधील भावनात्मक नाती दृढ होतील. भविष्या विषयी गंभीर व्हाल. अचानक खर्चात वाढ संभवते.
शुभ दिनांक : - २, ८, ११, १२, १३, १५,२३,२८,२९
अशुभ दिनांक : - १, ४, १०,१७,१८,१९,२०,२७,३०,३१