डिसेंबर महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे डिसेंबर महिना? जाणून घ्या...
डिसेंबर महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य
Published on

डॉ. सविता महाडिक

ज्योतिष भूषण

धनु रास

सुख-सुविधांमध्ये वाढ

धनु रास ही गुरूची रास आहे. त्याचप्रमाणे ही रास द्वीस्वभाव राशी आहे. त्यामुळे दुटप्पी वर्तन असते. ते त्यांच्या स्वभावातच असते. ही विषम राशी आहे. त्याचप्रमाणे पुरुष राशी आहे. त्यामुळे या राशीत धाडस, साहस, कर्तृत्व असे गुण निसर्गत:च असतात. कमजोरांचे, विपननांचे रक्षण करते. शौर्य गाजवणे, धैर्याने कार्य करणे, समरभूमीवर विजय प्राप्त करणे, राज्य करणे, गरजेचे पालनपोषण करणे, प्रजेला शिक्षण देणे, त्याचप्रमाणे स्वामिनिष्ठा, कर्तव्यतत्परता, उघडपणा, वेग किंवा गती अर्थातच कोणत्याही कामास चालना देणे असे गुण आढळतात. परंतु स्वभावातच हा स्वार्थीपणा असतो.

शिक्षण :- या महिन्यात क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रात विशेष अनुकूल वातावरण राहणार नाही. अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही हे लक्षात ठेवून अभ्यासाकडे जरा जास्तच लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. इतरत्र वेळ वाया घालवू नका. त्याचप्रमाणे वेळेचे नियोजन करा. तरीही आपल्या धाडस व आत्मविश्वासपूर्ण कार्यकुशलतेने अभ्यासातील सातत्याने आपणास हवे तसे यश मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रातही आपण यशस्वी व्हाल, तसेच टेक्निकल क्षेत्रातही यश लाभेल. परदेशासंबंधी शिक्षण घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील, मदत मिळू शकते.

पारिवारिक :- सबंध परिवारात एक प्रकारची शिस्त असणार आहे. त्यामुळे सर्व कार्य नीटनेटकी होतील. कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील. आर्थिक आवकही चांगली राहिल्याने सर्व गरजा पूर्ण होतील. घरातील सर्व व्यक्ती कार्यरत राहणार आहेत. परंतु कार्यास विलंब लागू शकतो. घरात धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे अथवा धार्मिक कार्याचे नियोजन होईल. कुटुंबातील तरुण-तरुणांचे विवाह ठरतील. आपण स्वतः जास्त स्पष्ट बोलण्याचे टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवावे.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- कुटुंबात आनंदी व उत्साही वातावरणाचा लाभ. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणांचे विवाह ठरून घरात मंगलकार्य घटित होईल. तरुण- तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येतील. नोकरीबाबतचा शोध संपू शकतो. आजपर्यंत आपले कार्य प्रयत्न करूनही पूर्ण होत नव्हते ते आता अल्प प्रयत्नात पूर्ण होत असलेले पाहून आश्चर्य वाटेल. व्यापार-व्यवसायातून फायदा होईल. आर्थिक बाजू भक्कम होईल. पती-पत्नीमध्ये समजूतदारपणा वाढेल व सहयोग वाढेल. आपल्या मनात चाललेल्या दुविधा जीवनसाथीच्या मार्गदर्शनामुळे दूर होतील. जीवनसाथीची भूमिका महत्त्वाची ठरेल. राहत्या घराचे लोचनीकरण करण्यासाठी खर्च होऊ शकतो. त्याचप्रमाणे नवीन खरेदीही करू शकाल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. सहकुटुंब प्रवासाचे योग आहेत. व्यापार-व्यवसायामधील परिस्थिती समाधानकारक राहील. इच्छा पूर्ण होतील, सरकारी कार्य पूर्ण करू शकाल. हा कालावधी इच्छापूर्तीचा राहील.

शुभ दिनांक : - २,५,६,१५,२१,२२,२३,२५,२९

अशुभ दिनांक : - १, ४,१०,१७,१८,१९,२०,२७,३०,३१

मकर रास

मन आनंदी व प्रसन्न राहील

मकर रास ही शनी महाराजांची रास आहे तसेच पृथ्वी तत्त्वाची आहे. अर्थतत्त्वाची राशी आहे. या राशी असलेल्या व्यक्तींचे आर्थिक व्यवस्थापन चांगले असते. ही समोरास आहे. ही स्त्री राशी आहे. स्त्री राशीतले सर्व गुन्हे या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसतात. समजूतदारपणा, शुश्रूषा, नम्रता, विनय, प्रेमळपणा असे गुण विशेषत्वाने दिसून येतात तसेच चर राशी असल्याने हिंडण्या-फिरण्याची मुळातच आवड असते. प्रवासाची आवड असते. सहनशीलता व सुबकपणा अशा प्रकारचे गुणवैशिष्ट्ये या राशींच्या जातकांमध्ये आढळतात.

शिक्षण :- शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रासाठी हा कालावधी अतिशय अनुकूल राहील. आकलनशक्ती चांगली राहील. लक्षात राहण्याचे म्हणजेच समजण्याचेही प्रमाण चांगले राहणार आहे. आपल्याला अपेक्षित यश मिळेल, पण प्रयत्नांची आवश्यकता आहे. घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. त्यामुळे अपेक्षित यश लाभू शकेल. साहित्य क्षेत्रातही आपणास चांगले योग आहेत. प्रसिद्धी मिळेल, अर्थार्जनही होईल, कला व क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी बजावू शकाल. प्रदेशासंबंधीचे सर्व शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळतील, तसेच अनुकूलता लाभेल, शिक्षणाविषयी आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील. त्यामुळे आनंदी व उत्साही राहाल.

पारिवारिक :- परिवारात नियमितपणा हवा असे आपल्याला वाटत असले तरी काहीना काही कारणांमुळे तो येत राहील. त्यामुळे कार्य व्यवस्थित पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. काहीसा विस्कळीतपणा येणार आहे. आपल्या स्वतःच्या पुढाकाराने हा दोष आपण दूर करू शकाल. त्यामुळे शांतपणे व पूर्ण विचारांती निर्णय घेणे हिताचे ठरेल. त्यातून चांगले मार्क मिळू शकतील अन्यथा अडचणींना सामोरे जावे लागू शकते. घरातील काही व्यक्तींच्या असमंजसपणाचा त्रास जाणू शकतो. त्यामुळे आपल्या कौशल्यपूर्ण निर्णयाने सर्व नीट होईल. त्यासाठी आपणास सर्वांच्या स्पर्धेत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. ते तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकाल व घरात शांतता व नियमितता निर्माण करू शकाल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- आपल्या व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रातील बाबतीत सामंजस्य स्वीकारल्याने मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल येऊन स्थिरता येईल. शांती व बुद्धिमत्तापूर्वक घेतलेले निर्णय बरोबर ठरतील. सफलतेचे प्रमाण वाढेल. मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हाल. नवीन व्यक्तीशी परिचय वाढून त्याचे मैत्रीमध्ये रूपांतर होईल. मन आनंदी व प्रसन्न राहील, सहकुटुंब-मित्रमंडळींसह पर्यटनाचा आनंद घेऊ शकाल. धार्मिक स्थळी भेट देण्याचे योग हातून दानधर्म होईल. सामाजिक धार्मिक क्षेत्रात सक्रिय योगदान द्याल. अध्यात्मिक क्षेत्रात तसेच गूढ बाबतीत रुची निर्माण होईल. ध्यानधारणा, योग अशा बाबतीत क्रियाशीलता वाढू शकते. आपल्यासमोरील कार्य उत्साहाने पूर्ण करून नवीन कार्य हाती घ्याल. कार्यक्षेत्रातील समस्या चतुराईने सोडवण्यात यश प्राप्त होईल.

शुभ दिनांक : - ६, ८, ११, १२, १३, २३, २५

अशुभ दिनांक : - १, ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१

logo
marathi.freepressjournal.in