

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
मेष
पती अथवा पत्नीचा भाग्योदय
मेष राशीवर मंगळाचे वर्चस्व आहे त्यामुळे ही मंगळाची रास आहे. त्याचप्रमाणे मेष राशीमध्ये सव्वादोन नक्षत्र येतात. अश्विनी हे केतूचे नक्षत्र आहे तर भरणी हे नक्षत्र शुक्राचे आहे. कृतिका हे रवीचे नक्षत्र आहे. अश्विनी नक्षत्र हे देवगणी नक्षत्र आहे. नक्षत्र मनुष्यगणी नक्षत्र आहे. कृतिका नक्षत्र राक्षसगणी आहे. अश्विनी नक्षत्र हे भूषण प्रिय असते, कलाकौशल्याची कामे करणारा, दक्ष, बुद्धिमान, वैद्य, मानी, चंचल, प्रवासी, कोणतेही काम चलत करणारा, तरतरीत, अधिकार गाजवणारा, पराक्रमी, उष्ण प्रकृती असलेला, श्रीमंत असे अश्विनी नक्षत्राचे स्वरूप आहे. अश्विनी नक्षत्राचे चार चरण, भरणे नक्षत्राचे चार चरण आणि कृतिका नक्षत्राचा पहिला चरण मिळून मेष रास तयार होते.
शिक्षण : सध्याच्या काळात अभ्यास प्रामाणिकपणे करणे गरजेचे राहणार आहे. त्याचप्रमाणे एकाग्र होण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागणार आहे. सातत्य व एकाग्रतेने अभ्यास केल्यास व योग्य दिशेने प्रयत्न केल्यास चांगले यश प्राप्त होऊ शकते. उच्च शिक्षण घेणाऱ्या जातकांनी सुद्धा हे लक्षात घेणे आवश्यक आहे. परदेशातील शिक्षणासाठी सुद्धा अधिक प्रयत्नांची गरज आहे. त्याचप्रमाणे नेटाने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. अर्थातच चांगल्या प्रयत्नांना व योग्य दिशांनी केलेल्या प्रयत्नांना निश्चित असे यशप्राप्त होते हे लक्षात ठेवणे जरुरी आहे.
पारिवारिक : कुटुंबात चांगले वातावरण राहणार आहे. कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून शुभ वार्ता मिळतील. त्याचप्रमाणे कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटून दिलासा मिळेल. काहींचे मंगलकार्य ठरू शकते. आपल्याला मात्र काही अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे त्याबाबत काळजी नको. सगळ्यांच्या गरजा पूर्ण करू शकाल. कुटुंबात मतभेद झाल्यास आपण सामंजस्याची भूमिका घेतल्यास आपली भूमिका निर्णायक ठरू शकते.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : सदरील काळात पती अथवा पत्नीचा भाग्योदय होऊ शकतो. कुटुंबातील सदस्य एकमेकांविषयी आपुलकीची भावना ठेवून असतील. एकमेकांमध्ये सहकार्य राहील. पूर्वी असलेले मतभेद संपुष्टात येतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न मिटतील. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतींमधून नोकरीचे बोलावणे येऊ शकते. बेरोजगारांना रोजगार मिळेल. दीर्घकाळ रखडलेली स्थायी संपत्ती, जमीनजुमला याविषयीचे व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. त्यातून भरीव अर्थलाभ होईल. कायदेविषयक कामे आपल्याबाजूने पूर्ण होतील तसेच वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले वाद मिळतील. सर्वमान्य तोडगा निघेल, मात्र काही वेळेस शत्रूंचा त्रास डोके वर काढू शकतो. राजकारणी मंडळींनी मात्र या कालावधीमध्ये जपून राहणे गरजेचे आहे. विरोधक प्रबळ होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे.
शुभ दिनांक : २, ३, १०, १३, १८, २२,२५,२६,२८
वृषभ
व्यावसायिक तेजी अनुभवास येईल
वृषभ राशीवर शुक्राचे कारकत्व आहे. म्हणजेच ऋषभ राशी शुक्राची रास आहे. सव्वादोन नक्षत्रे येतात. कृतिका नक्षत्राचे उरलेले तीन चरण शुभ राशीत येतात. कृतिका हे नक्षत्र रवीचे आहे. रोहिणी नक्षत्राची चार चरणे येतात. रोहिणी नक्षत्र हे चंद्राचे नक्षत्र आहे. नक्षत्राचे दोन चरण हे वृषभ राशीत येतात. कृतिका हे नक्षत्र राक्षसगणी आहे. हे नक्षत्र मनुष्यगणित नक्षत्र आहे. उष्ण प्रकृती असते. रोहिणी नक्षत्राची व्यक्ती मधुरवचनी, मित्र आचरण असणारा, खरे बोलणारा, शांत, सत्वगुणी, स्थिर मनी, विलासी, पापभिरू, श्रीमंत व्यापारी, गाई व पशूंची आवड असणारा असे स्वरूप असते. भृग नक्षत्र हे चपखल, चतुर, भित्रा, रोगी, बुद्धिमत्ता जेमतेम असू शकते. लबाड, परंतु उत्साहित धनिक असू शकतो. कृतिका नक्षत्राचे तीन चरण, रोहिणी नक्षत्राचे चार चरण व मृग नक्षत्राचे दोन चरण मिळून वृषभ रास तयार होते.
शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये अभ्यासासाठी चांगले योग आहेत. परंतु अभ्यासाचा कंटाळा करू नये तसेच आळस झटकावा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे ठरेल, अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये मन रमू शकते, त्यामुळे जाणूनबुजून अथवा विशेष प्रयत्नाने अभ्यास करावा लागेल, मन एकाग्र करता येईल तसेच कुसंगतीपासून दूर राहणे अत्यावश्यक ठरेल, अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे राहील, त्याचप्रमाणे योग्य दिशांनी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे लागतील. इतरांची मदत फारशी मिळणार नाही हे लक्षात ठेवावे. कला व क्रीडा क्षेत्रासाठी अनुकूल कालावधी आहे. निरनिराळ्या संधी चालून येतील. त्या संधीचे सोने करणे आपल्या हाती आहे हे लक्षात ठेवावे. काही वेळेस अचानक समस्या उभ्या राहू शकतात. परदेशी शिक्षण घेणाऱ्या अथवा परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या जातकांना अनुकूल कालावधी आहे. पण प्रयत्नात सातत्य असणे गरजेचे आहे
पारिवारिक : परिवारात तसेच आप्तेष्ट नातेवाईकांमध्ये वरवर पाहता शांतता व समाधान वाटत असले तरी कुठेतरी अशांतता व मतभेद यांचे वातावरण असू शकते. कुटुंबातील व्यक्तींच्या काही समस्या आहेत का. याचा विचार करून व कुटुंबातील इतर व्यक्तींशी विचारविनिमय करून त्यांच्या समस्या सोडविता येतील याकामी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची मदत होईल. चर्चेने सर्व समस्या सुटतात. त्यामुळे समाधान लाभेल. अचानक घरामध्ये पाहुणे येण्याची शक्यता आहे. मनोरंजनाचे कार्यक्रम आखले जातील. त्याचप्रमाणे जवळचे प्रवास होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये एखादी चांगली खरेदी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद राहील.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : हा कालावधी व्यवसाय-धंद्यासाठी पोषक ठरणार आहे. व्यावसायिक उलाढाल वाढल्यामुळे नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. चालू व्यवसायामध्ये नवीन संकल्पनांचा वापर करून तो एका नवीन उंचीवर नेऊन ठेवण्यास यश प्राप्त होईल. नवीन भागीदारीच्या व्यवसायाबाबत विचारणा होऊ शकते.
शुभ दिनांक : २, ३, ५, ६, १०, १८, १९, २०, २६, २८