

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
मिथुन
आनंदी व उत्साही वातावरणाचा लाभ
मिथुन राशीवर बुधाचे वर्चस्व असते. मिथुन रास ही बुधाची रास आहे. या राशीतील सव्वादोन नक्षत्र म्हणजे मृग नक्षत्र हे मंगळाचे आहे. आदरा नक्षत्र हे राहूचे आहे. पुनर्वसू नक्षत्र हे गुरूचे नक्षत्र आहे. मृग नक्षत्र हे देवगणी नक्षत्र आहे, तसेच ते धनिक मित्र लाभ, विवाह लाभ, सुगंधी पदार्थांची आवड असणे, पशुपक्ष्यांची आवड असणे, बोलका राहणे, अशा स्वरूपाचे हे नक्षत्र आहे. आदरा नक्षत्र हे गर्विष्ठ, लबाड, थोडे हिंसक, कृतघ्न, पाप करणे, कठोरपणा जास्त असतो, विद्या व बुद्धी क्षीण असते, पिशाच्च, विद्या व गुप्त विद्या यांची आवड असते. पुनर्वसू नक्षत्र शांत, सुखी, रोगी, नीतिमान, लोकसेवा करणारा असतो. मृग नक्षत्राचे दुसरे चरण, आदराचे चार चरण व पुनर्वसूचे तीन चरण मिळून मिथुन रास तयार होते.
शिक्षण : शिक्षणासाठी अनुकूल वातावरण आहे. शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये चांगले यश संपादित करू शकाल. कला व क्रीडा क्षेत्रामध्ये भाग्यवंतीचा अनुभव येईल. सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना अनुकूलता मिळणार आहे. परदेशासंबंधी सर्वप्रकारे चांगले, योग्य असल्याने परदेशामध्ये जाण्यासाठी योग्य वातावरण आहे. सर्व गोष्टी अनुकूल राहतील. इतरांची मदत मिळू शकते तसेच मार्गदर्शन मिळेल. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकाल व त्यात यश मिळेल.
पारिवारिक : परिवारामध्ये काही वेळेस आंबट-गोड अनुभव येतील, मिश्र फळे प्रतिपादित होतील, घरातील सदस्यांमध्ये थोडे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादविवाद निर्माण होऊ शकतात. वादविवाद ज्यामुळे तयार होतील अशा लहानमोठ्या प्रसंगांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. गैरसमज सहजी दूर होतील, मात्र त्यासाठी सकारात्मक संवाद ठेवणे गरजेचे राहील. अध्यात्मात रुची वाढू शकते. काही वेळेस धार्मिक प्रवास होतील. त्यामुळे एक प्रकारचे समाधान लाभेल. हातून दानधर्म होऊ शकतो. आर्थिक प्राप्ती मनासारखी राहील. त्यामुळे परिवारातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकाल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : मागील काही काळात अनुभव येणाऱ्या प्रतिकूलतेमध्ये परिवर्तन घडून आनंदी आणि उत्साही वातावरणाचा लाभ मिळेल. अनुकूलता अनुभवण्यास मिळेल. परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटून त्यांना नवनवीन संधी मिळतील. आपापल्या क्षेत्रात प्रगती होईल, विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. काहींचे प्रेमविवाह होतील. व्यापार-व्यावसायिकांना चांगल्या संधी मिळतील. चांगले फायद्याचे सौदे हाती येतील. आर्थिक प्रगती करू शकाल. काहींना राजकीय अथवा सरकारी लाभ मिळतील. सरकारी योजनांचा फायदा मिळू शकतो. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. शारीरिक पीडा संभवते. ज्वरपिडा होऊ शकते किंवा उष्णतेचे विकार होण्याची शक्यता. सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात सक्रिय योगदान द्याल. आपल्या हातून सत्कार्य घडेल. परिवारातील परिस्थिती आनंदीत असणार आहे. अवघड परिस्थितीतून चांगले मार्ग काढू शकाल. समस्यांवर मात करू शकाल.
शुभ दिनांक : २, ३, ५, ६, ७, १३, १८,१९,२०,२२,२६,२८
कर्क
नवीन करारांची शक्यता
कर्क रास ही चंद्राची रास आहे. या राशीतील सव्वादोन नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र व पुनर्वसू नक्षत्र व आश्लेषा नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र हे गुरूचे नक्षत्र आहे, तसेच ते देवगणी नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्र हे देवगणी नक्षत्र आहे. आश्लेषा हे नक्षत्र राक्षसगणी आहे. हे सुशील, बुद्धिमान, शांत, सुखी, संतोषी, विद्या व्यासंगी, नितीन, सत्वगुणी, कला कौशल्य संपन्न लोकसेवा करणारा ईश्वरा प्रति श्रद्धा ठेवणारा असा जातक असतो. पुष्य नक्षत्राची वैशिष्ट्य म्हणजे जातक शांतचित्त सुभाग्य पंडित. धनिक, धर्मशील, श्रीमान, आत्मविश्वासू, कायदे पंडित, विद्वान, सत्वगुणी असतो. आश्लेषा नक्षत्राची गुणवैशिष्ट्ये म्हणजे सर्वभक्षी, पापकर्मी, कृतघ्न, दुर्त, विषारी वस्तूंचा व्यापार करणारा त्याचप्रमाणे फळफळावळींचा व्यवसाय करणारा, राजकारणी, साहसी, वैभवाची इच्छा करणारा, मानी, स्वातंत्र्यप्रिय, मंदबुद्धी असलेला, अविद्वान इत्यादी वैशिष्ट्ये आढळतात. पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण, पुष्य नक्षत्राचे चार चरण आश्लेषा नक्षत्राचे चार चरण मिळून कर्क रास तयार होते.
शिक्षण : या कालावधीमध्ये शिक्षणासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. या अनुकूल कालावधीचा फायदा जरूर करून घ्यावा. कला, क्रीडा क्षेत्रातही आपणास चांगले यश लाभणार आहे. मात्र परदेशाच्या संबंधित काही शैक्षणिक प्रगती हवी असल्यास त्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास त्यात आपल्याला यश लाभेल. तांत्रिकी शिक्षणात चांगले यश मिळणार आहे. त्यामुळे सतत अभ्यासात मग्न राहा. अनुकूल ग्रहमानाचा फायदा मिळेल व चांगले यश संपादित करता येईल.
पारिवारिक : कुटुंबामध्ये उत्तम वातावरण असणार आहे. मुख्य म्हणजे आपल्या उत्पन्नाचा ओघ म्हणजेच आर्थिक ओघ सतत चालू राहणार आहे. त्यामुळे आपण कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करू शकाल व आपल्या जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने सांभाळू शकाल. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य समाधानी राहतील. त्याचप्रमाणे काही वेळेस जास्तीच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागण्याची तयारी ठेवा. कुटुंबातील महिला एकमेकांशी सहकार्याने वागतील. परिवारात एखादे मंगलकार्य करण्याचे नियोजन होऊ शकते. सभासमारंभाची निमंत्रणे येतील.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : सुरुवातीलाच शुभ ग्रहांची मदत मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी-धंदा-व्यवसाय इत्यादी क्षेत्रात नवीन करारांची शक्यता. आपल्या भाग्योदयाची बीजे पेरली जाणार आहेत. नवीन केलेले नियोजन भविष्यामध्ये फायदेशीर ठरू शकेल. व्यवसाय, धंद्यात त्या दृष्टीने हालचाली करणे हितकारक ठरेल. उत्पन्नात वाढ झाल्याने आपण चिंतामुक्त होणार आहात, मात्र चालू नोकरीमध्ये ताणतणावाला तोंड द्यावे लागेल तसेच कायदेशीर बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. आपल्या मौल्यवान वस्तू महत्त्वाची कागदपत्रे वाहने सांभाळून ठेवणे. आपल्या कुटुंबात तसेच कार्यक्षेत्रात समतोल ठेवणे हिताचे ठरेल. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम मिळतील. आपणास हवा तसा बदल मिळेल. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्याही आरोग्याकडे लक्ष ठेवावे लागेल. आत्मविश्वासात वृद्धी होईल.
शुभ दिनांक : २, ३, ५, ६, ७, १०, २०, २२, २८