आजचे राशिभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 17, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - विरोधकांनी तोंड वर काढले तरी त्याचा काही फारसा फायदा होणार नाही.आपल्या कामाने व धाडसाने विरोधकांना नामोहरम कराल.

वृषभ - नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश येण्यासाठी अडचणी येण्याचीशक्यता आहे.काही कुयोग जरी असले, तरी तुम्ही सर्व चांगल्या तऱ्हेने निभावून नेणार आहात.

मिथुन - कुठलेही काम विचारपूर्वक करा, अति धाडस करू नका. बोलताना संयम पाळा, फसवणुकीपासून सांभाळा.कोणतेही काम अर्धवट राहणार नाही याची काळजी घ्या.

कर्क - व्यापार व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. त्यात जर आपण कलाक्षेत्र साहित्य सत्य याच्या मध्ये काम करत असाल तर जास्त मनासारख्या घटना घडतील.

सिंह - कामे करताना काही अडचणी आल्या तरी तुम्ही त्याच्यावर मात कराल. तुमचे नियोजन चांगले असल्यामुळे, कामामध्ये सहजता येईल.

कन्या - महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्कात रहावे.कामानिमित्त इतरांशी संवाद साधाल.महत्त्वाच्या गाठीभेटी आज करून घ्या.कामांना वेग येईल त्यासाठी तुमचा प्रयत्न यशस्वी ठरतील.

तुळ - कुटुंबातील काही प्रश्न असतील ते स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा.कुटुंबातील व्यक्ती समस्येवर तुमच्याकडून उपाय योजनेची अपेक्षा करतील.

वृश्चिक - आज आपणाला चांगल्या संधी प्राप्त होणार आहे. पण स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे फार आवश्यक आहे. तुमच्याजवळ पर्याप्त वेळ आहे त्याचा उपयोग चांगला करा.

धनु - तुमच्याकडे सहनशीलता आहे, पण सातत्याने विविध गोष्टींवर विचार करून मनावर ताण येण्याची शक्यता आहे. ताण कमी होईल अशा गोष्टी करणे आवश्यक आहे.

मकर - आज आपण अडचणींवर मात करून काम करण्याचा प्रयत्न करावे. अति महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. यामध्ये आपणास सहकार्‍यांचे सहकार्य घ्यावे लागेल.

कुंभ - नियोजनपूर्वक केलेली कामे नीट व व्यवस्थित होतील . व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. अधिकाराचा वापर योग्य तर्‍हेने करून घ्या.

मीन -आपल्या तोलामोलाच्या व्यक्तींची व्यवहार करताना त्यामध्ये व्यवहाराचा वास्तविकतेचा जास्त विचार करावा, भावनेला महत्त्व देऊ नये.

logo
marathi.freepressjournal.in