आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 21, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
Published on

मेष - आजचा दिवस आपणास कार्य सफलतेचा जाणार आहे. आवश्यक कामांकडे लक्ष दिले जाणार आहे. कामे विचारपूर्वक केली जाणार आहेत. आपले मनोबल पण उत्तम राहणार आहे.

वृषभ - आपले मन आज हलके होणार आहे. कामाचे टेन्शन दूर होणार आहे. त्यामुळे कामामध्ये लक्ष पण लागणार आहे. सामाजिक कामामध्ये कार्यरत राहाल प्रतिष्ठा मिळेल.

मिथुन - काही व्यक्तींना कामाची दगदग होणार आहे. कामाचा ताण जाणवेल. सहकाऱ्यांची सहकार्याची अपेक्षा ठेवू नका, ते आपणास मदत करू शकणार नाहीत. आपले खिसा पाकीट सांभाळा.

कर्क - आपल्या कामामध्ये आपण स्वतः लक्ष घालाल, त्यामुळे महत्त्वाची कामे करून घ्या. व्यापार-व्यवसायात आपणास अपेक्षित यश लाभलेल. भागीदाराचा सल्ला उपयोगात येईल.

सिंह - नोकरीत काम वाढणार आहे. पण वाढले तरी तुम्ही तुमचे काम कुशलतेने पार पाडाल. कामातल्या अडचणी स्वतःच्या बुद्धिचातुर्याने सोडवाल, त्यामुळे कामे चांगल्या प्रकारे कराल.

कन्या - मनोबल चांगले असेल. नवीन परिचय वाढतील सामाजिक दृष्टिकोनातून आपणास हे परिचय उपयोगी पडतील आपण आपले कार्य जिद्दीने पुरे कराल.

तुळ - आजचा दिवस आनंदाचा आहे. हे मन शांत राहणार आहे. घरातील प्रॉपर्टी च्या कामामध्ये लक्ष घालावे लागणार आहे. त्याची कागदपत्रे नीट तपासावीत.

वृश्चिक - कामासाठी आपण इतरांशी संवाद साधाल. मात्र संवाद साधताना बोलण्यामध्ये कडवटपणा येऊ देऊ नका नाही तर कामे होता होता राहतील. गोड बोलून कामे करून घ्या.

धनु - आर्थिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे प्रश्न सुटण्याचा आजचा दिवस आहे. निराशा दूर होईल, शुभ ग्रहांची साथ आपणास उत्तम आहे. नवीन खर्च समोर येतील.

मकर - आपले मनोबल उत्तम राहणार आहे. कामामध्ये झालेली दिरंगाई दूर होईल. कामेही सुरळीतपणे होतील त्यामुळे काम करण्यास आनंद ही वाटेल दिवस चांगला आहेत.

कुंभ - आपले जुने विचार व संकल्पना प्रगतीला मारक ठरण्याची शक्यता आहे. वास्तववादी विचाराने फायदे होतील फूट पाडणारे विचार, भावना आणि अविचार यावर नियंत्रण ठेवा.

मीन - नोकरीमध्ये आपणास हकार्‍यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कामाचे नियोजन करणे आवश्यक आहे. कामे जर आपण वाटून दिली तर, लवकर होतील.

logo
marathi.freepressjournal.in