आजचे राशिभविष्य, २३ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 23, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल ठरेल मानसिक प्रसन्नता लाभेल. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस.

वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रात तसेच नोकरीच्या ठिकाणी तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आरोग्य चांगले राहून आर्थिक लाभ संभवतो.

मिथुन - व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभ संभवतो जुनी आर्थिक येणी येतील. कुटुंबात एखादे धार्मिक अनुष्ठान घडू शकेल नातेवाईक आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील त्यांचे सहकार्य लाभेल.

कर्क - काही अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे मानसिक अस्वस्थता जाणवेल. शांतचित्ताने देणे घ्या वादविवाद टाळा. कौटुंबिक सुख मिळेल.

सिंह - रोजची दैनंदिन कामे सुरळीत होतील. एखादे काम अर्धवट राहू शकते परंतु ते पूर्ण करण्यासाठी इतरांची मदत मिळेल आर्थिक बाब चांगली राहील.

कन्या - मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्यता आहे. कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात स्वभावात चिडखोरपणा येण्याची शक्यता असल्यामुळे शांत राहणे गरजेचे आहे.

तुळ - आपल्या बोलण्याने अथवा वागण्याने आपण इतरांची मने जिंकू शकाल आपली महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्चिक - हातात घेतलेली दैनंदिन कामे यशस्वी होतील. कार्यात गतिशीलता असेल कार्यमग्न राहाल मात्र इतरांवर कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपवू नका.

धनु - आपल्या अवतीभवती मनस्ताप दायक घटना घडण्याची शक्यता आहे. जाणीवपूर्वक लहान मोठ्या गोष्टीमुळे होणारे वादविवाद टाळावेत कामाचा ताण जाणवेल.

मकर - जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे वेळ कसा जाईल हे समजणार नाही जुन्या आठवणीत रमून जाल मित्रमंडळीं समावेत एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करू शकाल.

कुंभ - काही अनावश्यक गोष्टीत तुमचा वेळ व पैसा खर्च होण्याची शक्‍यता आहे. खर्चावर नियंत्रण आवश्यक. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढण्याची शक्यता आहे.

मीन - कुटुंबामध्ये जास्ती वेळ द्यायला घरातील मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल घरगुती समस्या सोडवण्यात पुढाकार घ्याल अर्धवट राहिलेले एखादे काम पूर्ण करू शकाल.

logo
marathi.freepressjournal.in