मेष - सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस निर्माण होऊन त्या कार्यात सक्रिय योगदान द्याल. कलाकार खेळाडूंना अनुकूल कालावधी आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळतील.
वृषभ - आपल्या मनात बरेच दिवस घर करून राहिलेली एखादी महत्वाची आशा-आकांक्षा पूर्ण होईल. उत्साहाने व आत्मविश्वासाने आपल्या समोरील कामे पूर्ण कराल.
मिथुन - आपले केलेले नियोजन सफल होऊन अपेक्षित फलप्राप्ती होईल. घेतलेले निर्णय बरोबर ठरणार आहेत. महत्त्वाच्या कार्यात यशप्राप्ती झाल्यामुळे आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होईल.
कर्क - कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचा भाग्योदय होऊन उत्कर्ष तसेच प्रगती होईल. आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी लाभेल तसेच नोकरी विषयक मुलाखती यशस्वी होतील.
सिंह - कुटुंब परिवारात उत्साह व आनंद वाढविणाऱ्या वार्ता मिळतील. महत्त्वाची कार्य हातावेगळी करता येईल. परंतु त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आवश्यक राहतील.
कन्या - ओळखीने अथवा मध्यस्थीने प्रश्न सुटतील त्यांची मदत मिळू शकते परंतु आपण आपले मत अथवा म्हणणे स्पष्टपणे त्यांच्या समोर सादर करणे आवश्यक आहे.
तुळ - उपलब्ध झालेल्या संधी आणि त्या फलद्रूप करण्यासाठीचे प्रयत्न यांचा योग्य समन्वय साधल्याने प्रगतीचा आणि उन्नतीचा वेग वाढेल.
वृश्चिक - आपल्या कुटुंबीयांसमवेत तसेच मित्रमंडळींच्या बरोबर अथवा नोकरी व्यवसाय धंदा यांच्या निमित्त्याने जवळचे तसेच दूरचे प्रवास घडून शकतात.
धनु - नोकरी धंदा व्यवसाय अथवा घरगुती कारणांमुळे दूरचे प्रवास संभवतात प्रवासात काळजी घेणे हितकारक ठरेल. महत्त्वाची कागदपत्रे मौल्यवान वस्तू व वाहने सांभाळा.
मकर - जमीनजुमला स्थावर संपत्ती याविषयीचे व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करतील.भावंडांमधील असलेले वडिलोपार्जित संपत्ती विषयी असलेले वाद संपुष्टात येतील.
कुंभ - आजूबाजूस गतिमान घटना घडून अनुकूलते मध्ये वृद्धि होईल दीर्घ काळ आपण जे काम पूर्ण होण्याची वाट पाहत होता असे काम पूर्ण झाल्याने उत्साहात वाढ होईल.
मीन - कोणत्याही लहान-मोठ्या कामाविषयीचे निर्णय घेताना संयम बाळगणे हिताचे ठरेल पूर्ण विचाराअंती शांतपणे तसेच वेळ पडल्यास इतरांच्या सल्ल्याने सुद्धा निर्णय घेऊ शकाल.