'२६ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
'२६ मे'चे राशीभविष्य!

मेष - स्वतः शांत राहून समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. नोकरीमध्ये अनुकूल वातावरण लाभेल. नोकरीविषयक दिलेल्या मुलाखती यशस्वी होतील.

वृषभ - कुटुंबात एखादा कार्यक्रम ठरल्यामुळे नातेवाईक, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. व्यवसायात समाधानकारक परिस्थिती राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी टिकवण्यात यश मिळेल.

मिथुन - कलाकार खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळतील. मानसन्मानाचे योग आहेत. कुटुंबांमधील वातावरण चांगले राहून मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर वार्ता कानी येतील.

कर्क - आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्याने कुटुंबातील सदस्यांसाठी खरेदी करू शकाल. स्वतःसाठी खरेदी करण्याचा मोह होईल. घरातील भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल. व्यावसायिक जुनी येणी वसुल होतील.

सिंह - काही सकारात्मक महत्त्वाच्या घटना घडल्यामुळे आपले रोजचे नियोजन बदलावे लागेल. व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. पत्रव्यवहार पूर्ण होईल. या धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून उलाढाल वाढेल.

कन्या - आपल्या गोड बोलण्याने महत्त्वाची कामे यशस्वी होतील. थोरामोठ्यांचे सहकार्य ला भेल. नवीन उपक्रम हाती घेता येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल.

तुळ - नोकरीमध्ये अनुकूल घटना घडतील. पूर्वी केलेल्या कामाचे अपेक्षित फळ मिळेल. पदोन्नती अथवा वेतनवृद्धीसारख्या घटना घडू शकतात. जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. वाद-विवाद सांभाळा.

वृश्चिक - लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा. व्यवसायामध्ये उधारी टाळा. काही बाबतीत आर्थिक मदत लागू शकते. जमीनविषयक व्यवहार गतिशील होतील. जीवनसाथी साथ देईल.

धनु - समाजातील मान्यवर तसेच थोरामोठ्यांच्या ओळखी होतील. सामाजिक कार्यक्रमात रस घ्याल. धार्मिक तसेच सामाजिक समारंभाची निमंत्रणे मिळतील. मन धार्मिकतेकडे झुकेल.

मकर - दैनंदिन कामाच्या व्यतिरिक्त महत्त्वाच्या कामांसाठी कष्ट व परिश्रम पडतील. त्याचबरोबर खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल. सरकारी स्वरूपाची कामे गतिशील होऊन पूर्णत्वाच्या मार्गाने जातील.

कुंभ - अनुकूल दिवस आहे. रोजची दैनंदिन कामे वेळेपेक्षा अगोदर पूर्ण होताना बघून आश्चर्य वाटेल. व्यवसाय धंद्यातील उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. धार्मिक स्थळी प्रवास होतील.

मीन - कामाच्या धावपळीमध्ये कुटुंबासाठी वेळ देऊ शकणार नाही. जवळचे प्रवास घडू शकतात. काही कामे अर्धवट राहण्याची शक्यता. नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील. आर्थिक लाभ.

logo
marathi.freepressjournal.in