'९ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
'९ मे'चे राशीभविष्य!

मेष - कुटुंब परिवारातील मुला मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडल्यामुळे मानसिक उत्साह वाढेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रवास कार्यसिद्धी होईल.

वृषभ- व्यवसाय धंद्यातील उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल काही. करारमदार होण्याची शक्यता. सार्वजनिक तसेच सामाजिक कार्यामध्ये रस घेऊन सक्रिय योगदान द्याल.

मिथुन - आपल्या रोजच्या जीवनातील दैनंदिन कामे जिद्द व चिकाटीने पूर्ण कराल. जमिनी विषयक किंवा स्थावर मालमत्तेच्या विषयक असलेले व्यवहार गतिशील होतील ओळखीचा उपयोग होईल.

कर्क - आजचा दिवस अनुकूल जाईल महत्त्वाची कामे अथवा गाठीभेटी उरकून घ्या वैवाहिक जीवनात मात्र मतभेदांची शक्यता असल्यामुळे वादग्रस्त बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करू नका.

सिंह - कर्जाची आवश्यकता भासल्यास अथवा आर्थिक मदतीची गरज भासल्यास कर्जे मंजूर होऊ शकतात थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे वाढते सहकार्य लाभल्यामुळे समाधानी राहाल.

कन्या - आपल्या आजूबाजूला एखादी महत्त्वाची घटना घडल्यामुळे तुमच्या वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे पण हा बदल सकारात्मक ठरवू शकतो.

तुळ - स्वतःचे काम स्वतः करा. कोणाच्याही वरती जबाबदारी देऊ नका अथवा इतरांचे सहकार्य अपेक्षित ठेवू नका. कोणालाही गृहीत धरू नका. आर्थिक व्यवहारात सतर्क राहण्याची आवश्यकता.

वृश्चिक - मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसाय धंद्यातील उधारी उसनवारी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल आपली देणी आपण सुकती करू शकाल. कुटुंबातील खर्च वाढण्याची शक्यता.

धनु -आपल्या इच्छेविरुद्ध प्रवास करावा लागण्याची शक्यता प्रवासामध्ये आपल्या वस्तू तसेच महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा गहाळ होण्याची शक्यता. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक.

मकर-अनपेक्षित धनलाभ झाल्यामुळे मनसोक्त खर्च करावा परंतु आपण चुकीच्या गोष्टींसाठी अथवा व्यक्तींसाठी खर्च करत नाही ना याचा विचार आवश्यक ठरेल.

कुंभ- कामाची व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ व दगदग होईल. कामावर ती लक्ष केंद्रित करा गोंधळून जाऊ नका इतरांचे सहकार्यावर अवलंबून राहू नका. व्यवसाय धंद्यात एखादी नवीन सो संधी मिळेल.

मीन - रखडलेली शासकीय कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. अपेक्षित पत्रव्यवहार पूर्ण होतील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊ शकाल आपले म्हणणे थोडक्यात पण स्पष्टपणे इतरां समोर सादर करणे.

logo
marathi.freepressjournal.in