२१ मे'चे राशीभविष्य!

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.
२१ मे'चे राशीभविष्य!

मेष - मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. त्यामुळे आरोग्यही चांगले राहू शकते. सकारात्मक लोकांचा सहवास लाभेल. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.

वृषभ - व्यवसाय धंद्यातील परिस्थिती चांगली राहून उलाढाल वाढेल. मात्र संयमाने वागणे बोलणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. नोकरीत प्रगती करू शकाल. आर्थिक आवक चांगली राहील.

मिथुन - नोकरी आपले अधिकार वाढतील, वर्चस्व वाढेल, पण जबाबदारी ही त्याच प्रमाणात वाढतील. उत्साहाने काम कराल. मात्र कामात दिरंगाई नको. जुनी येणी वसूल होतील.

कर्क - नोकरीत महत्त्वाची जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याकडून मोठी अपेक्षा ठेवली जाईल. त्यामुळे तुम्ही संयमाने वागणे आवश्यक आहे. अनुकूल घटना घडतील. भावंडांची वाद-विवाद टाळा.

सिंह - अनुकूल ग्रह मनामुळे भाग्याची साथ राहील. मात्र नोकरीत बदलीची शक्यता कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो, तसेच स्थान बदलही होईल. नवीन जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील.

कन्या - महत्त्वाची कामे अथवा प्रस्ताव मार्गी लागतील. व्यवसाय धंद्यात नवीन करारमदार होऊन एखाद्या फायद्याचा सौदा हाती येईल. काही नवीन संकल्पना व्यवसायात आपण राहू शकाल.

तुळ - कौटुंबिक सौख्य मिळून जीवनसाथीची साथ मिळेल. महत्वाची कामे होतील. सरकारी कामं मध्ये विलंब होऊ शकतो. त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता. पैसे व वेळ दोन्ही खर्च होतील.

वृश्चिक - आर्थिक आवक चांगली राहील. नोकरी सर्वसामान्य परिस्थिती राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. भावंडांशी वाद-विवाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.

धनु - व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील. त्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागेल. मात्र वसुली करताना डोके शांत ठेवा. वाद विवाद करू नका. समजदारी ने वागा .नोकरीत वरिष्ठांशी जमवून घ्यावे लागेल.

मकर - नोकरीत काही महत्त्वाचे बदल करू शकता. काही वेळेस अप्रिय निर्णय सुद्धा स्वीकारावे लागतील. बदलीची शक्यता. वरिष्ठांशी वाद विवाद घालू नका. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा.

कुंभ - घरात खेळीमेळीचे वातावरण राहील याची जबाबदारी आपल्यावर असेल. क्षुल्लक कारणावरून आपण वाद घालू नका. काहींना जवळचे प्रवास करावे लागतील. आर्थिक बाजू चांगली राहील.

मीन - आर्थिक आवक चांगली राहील. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या व्यवहारात कागदपत्रे वाचूनच खात्री करून सही करा. बोलण्यावर आणि वागण्या वरती संयम ठेवा.

logo
marathi.freepressjournal.in