मेष - आपले मन अस्वस्थ्य असणार आहे.जास्त विचार करू नका मनावर उगाच स्थान येणार आहे. शांतपणे व मन स्थिर करून कामे करा. कामावर लक्ष केंद्रित करणे फार आवश्यक आहे. अन्यथा चुका होऊ शकतात.
वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रात विस्तार करण्यासाठी आपले चांगले नियोजन असणार आहे. भागीदार आपणास चांगले सहकार्य देणार आहे. नवीन माहितीचा चांगला उपयोग करून घेणार आहात. नफा चांगला मिळेल.
मिथुन - नोकरी च्या ठिकाणी वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. म्हणून मन शांत ठेवून काम करणे आवश्यक आहे. कामामध्ये आपणास सहकाऱ्यांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.
कर्क - कलाकारांना व खेळाडूंना चांगले यश मिळेल. आपणास चांगली प्रसिद्धी मिळणार आहे. कामकाजात प्रगती होणार आहे. आर्थिक लाभ चांगले होतील. आपली महत्त्वाची कामे सहज होणार आहेत.
सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात आपले काम चांगले होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे चांगली पार पडतील. भावंडांचे नाते संबंध चांगले ठेवण्याची आवश्यकता आहे. आर्थिक बाजू चांगली असणार आहे.
कन्या - प्रवास होण्याची शक्यता आहे. आपला व्यवसाय परदेशात असेल तर त्यामध्ये चांगली प्रगती होणार आहे. प्रगतीच्या चांगल्या बातम्या समजतील. आर्थिक बाजू चांगली असणार आहे.
तुळ - आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये व्यापार व्यवसायामध्ये खेळते भांडवल लागत होते त्याची चण चण भासत होती. ती आज भासणार नाही. घरातूनच आपल्याला सहकार्य मिळणार आहे. प्रगती होणार आहे.
वृश्चिक - काहीजणांना कामांमध्ये ताण निर्माण होणार आहे. कामाचा ताण जाणवणार आहे. एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. दैनंदिन कामे सुरळीत होणार आहेत.
धनु - आज आपली विनाकारण धावपळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला थकवा येण्याची शक्यता आहे. कामाचे नियोजन करूनच काम करा. आर्थिक व्यवहार सांभाळून करावे.
मकर - नोकरी व्यवसायामध्ये आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या सांभाळल्या जाणार आहेत. कामांमध्ये प्रगती होणार आहे. मित्र-मैत्रिणींबरोबर मनोरंजनकरण्याकडे लक्ष राहणार आहे. आनंदी असाल.
कुंभ - गुरुकृपा लाभेल. कामे मार्गी लागतील. आपल्या आरोग्य चांगले असेल. धार्मिक प्रवास होऊ शकतो. हाती घेतलेल्या कामांमध्ये सुयश लाभणार आहे. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखी होतील.
मीन - आत्मविश्वासाची कमी भासणार आहे.वारसा हक्काच्या कामांमध्ये प्रगती होणार आहे. जोडीदाराकडून आर्थिक सहकार्य लाभणार आहे. खिसा पाकीट सांभाळा. नोकरीच्या कामांमध्ये ताण जाणवेल.