मेष - आजचा दिवस आपणासाठी फारसा अनुकूल नाही.कुटुंबातील सदस्यांची आरोग्याची काळजी वाढणार आहे. कोणतेही मोठे सौदे करू नका. नुकसान होऊ शकते.वाहन चालवताना काळजी घ्या.
वृषभ - भागीदार व्यक्तींकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे.रोजच्या जीवनामध्ये स्वयंशिस्त व स्वयम् नियंत्रण असणे आवश्यक आहे. आज संमिश्र घटनांचा दिवस आहे. खूप मोठे पाऊल उचलताना विचार करा.
मिथुन - घरच्या कामात किंवा आपल्या कार्यक्षेत्रा मध्ये आपण खूप व्यस्त राहणार आहात. मानसिक तणाव आपणास जाणवणार आहे. आर्थिक दृष्ट्या आपल्याला ठीक असणार आहे .
कर्क - आज आपल्या कार्यामध्ये यश येणार आहे.आर्थिक लाभ चांगल्याप्रकारे होतील .विद्यार्थ्यांना कष्टाचे चीज होणार आहे. आपल्या सततच्या कामाने आपली प्रशंसा होणार आहे. मुलांची प्रगती होईल .
सिंह - आजचा दिवस आनंद देणारा आहे.आज अनेक अनपेक्षित घटना घडतील. त्या आपल्या फायद्याच्या असणार आहेत.आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सहजता असणार आहे.घरातून सहकार्य मिळेल.
कन्या - आज आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. आपल्या जोडीदारासाठी आजचा दिवस जास्त अनुकूल आहे.आपल्या करिअरमध्ये प्रयत्न करून यश आहे. प्रवास सफल होतील.
तुळ - घराकडे दुर्लक्ष न करता अधिक लक्ष द्या आणि काळजी घ्या कौटुंबिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा.आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.मानसिकरीत्या कणखर रहाल.
वृश्चिक - आपल्या सहकाऱ्यांच्या धोरणात्मक गोंधळ आणि गैरसमज होण्याचा आजचा दिवस आहे.महत्वाचे विस्तार आणि योजना थांबवा.पैशाच्या देण्याघेण्याचे व्यवहार खूप सांभाळून करा.
धनु - कौटुंबिक आयुष्यात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे.आर्थिक दृष्टीने आजचा दिवस फार वाईट नसला तरी खर्च विचार पूर्वक केले पाहिजे. व खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर - व्यावसायिक पातळीवर आज आपली चांगली प्रगती होणार आहे. मात्र जास्त जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आपल्याला चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. आपणास सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल.
कुंभ - वरिष्ठांकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात चांगले बदल घडणार आहेत. नवीन नवीन कामे समोर दिसतील. कामामध्ये आपण व्यस्त राहाल.
मीन - आपल्या व्यवसायामध्ये आपणास चांगले यश मिळणार आहे.नवीन संधी चालून येतील.संधीचा फायदा घ्या.आजचा दिवस आपल्याला अत्यंत अनुकूल आहे.फायदेशीर प्रवास होतील.भाग्य वृद्धि होईल.