आजचे राशिभविष्य, २६ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 26, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!
आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on

मेष - रोजची दैनंदिन कामे लवकर पूर्ण होतील आरोग्य उत्तम राहील उत्साह व उमेद वाढल्यामुळे आपल्या महत्वाच्या कामांना वेळ देऊ शकाल व्यवसायात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

वृषभ - नोकरीमध्ये हाताखालील लोकांची तसेच वरिष्ठांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल केलेल्या नियोजनात काही बदल करावे लागतील वरिष्ठांचे म्हणणे ऐकावे लागेल.

मिथुन - कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह मधील अडथळे दूर होतील तसेच संततीचे असलेले प्रश्न मार्गी लागतील आप्तेष्ट व नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.

कर्क - नियोजनाद्वारे हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल परंतु त्यासाठी कार्यमग्न राहणे आवश्यक ठरेल तसेच कोणाबरोबरही वाद-विवाद करू नयेत मतभेदांची शक्यता.

सिंह - जिद्द व चिकाटीने आपल्या समोरील कामे पूर्ण कराल नोकरीमध्ये तसेच व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील आयत्या वेळेस काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

कन्या - कौटुंबिक जीवनात सुसंवाद व समन्वयाने कार्य साधारण व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल झालेल्या कारणांनी आर्थिक परिस्थिती सुधारेल नवीन उधारी करू नका.

तुळ - आपला आत्मविश्वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल आरोग्य उत्तम राहून कुटुंब परिवारात एखादी महत्त्वाची सकारात्मक वार्ता मिळेल. नोकरीमध्ये सर्वसामान्य परिस्थिती राहील.

वृश्चिक - महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काही कारणास्तव जवळचा तसाच दुरचा प्रवास घडेल प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील तसेच महत्त्वाची कागदपत्रे जपा.

धनु - एखादा अप्रिय निर्णय स्वीकारावा लागल्या मुळे मनोबल कमी होईल परंतु नाराज होण्याची गरज नाही काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मकर - नोकरीमध्ये अथवा व्यवसाय-धंद्यात अनुकूल वातावरण राहील मात्र आपल्या बोलणे, वागण्यावर वरती नियंत्रण आवश्यक आहे. खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल.

कुंभ - स्वतःच्या कार्यक्षेत्रात उत्तम स्थिती राहून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. मात्र शांतपणे आणि पूर्ण विचारांती निर्णय घेण्याची आवश्यकता.

मीन - कौटुंबिक सुख लाभून जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे हितकारक ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in